महाळुंग (पायरीपूल) एकमुखी दत्त मंदिरात हजारो भाविकांनी घेतला दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ
गुरुवारी आणि पौर्णिमेला होते महाप्रसादाचे आयोजन

महाळुंग तालुका माळशिरस येथील एक मुखी दत्त मंदिर, पायरीपूल येथे खास पौर्णिमेनिमित्त भव्य असे किर्तन महोत्सव आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तन महोत्सवामध्ये ह भ प राजेंद्र मुंडफणे महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले, तसेच आजच्या महाप्रसादाचे आयोजन शिरीष चव्हाण यांच्याकडून करण्यात आले होते. यावेळी माजी जि प सदस्य अरुण तोडकर, संभाजी जाधव व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली.
हजारो महिला व पुरुष, दत्त भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. मंदिराच्या बाजूलाच आनंद धाम मठाचे काम देखील सुरू आहे. भल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली, निसर्गरम्य वातावरणामध्ये एक मुखी दत्त मंदिर प्रसन्न व खुलून दिसत आहे. परिसरातील भाविक भक्तांची गुरुवारी व पौर्णिमेच्या दिवशी मोठी दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी होत असते. प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन या मंदिरामध्ये केले जाते. अशी माहिती मंदिर समितीच्या सदस्यांकडून देण्यात आली.
यावेळी सर्व भाविक भक्त, मंदिर समितीचे अध्यक्ष अभिमन्यू साळुंखे, सचिव पूनम साळुंखे, डायरेक्ट बापू तात्या मुंडफणे, तात्या जाधव, महादेव चव्हाण, दादा जाधव, दादा लाटे, हनुमान जमदाडे, आबासाहेब जाधव, भाऊसाहेब साळुंखे, दादा वाघ, मंदिर समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.