महाराष्ट्र

पांडुरंग कारखान्याच्या बगॅस डेपोस आग | आठ ते दहा हजार मे.टन बगॅस वाचवण्यामध्ये कारखान्यास यश

आग्नीशामक यंत्रणा व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रामामुळे मोठा आनर्थ टळाला.

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे बगॅस डेपोस आग ….. 

श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला बुधवारी दुपारी साडेचार वाजता, सर्व परिसरात प्रचंड उन्हाच्या झळा व वादळी वारे सुरु असताना, बगॅस साठवणुकीच्या यार्डमध्ये  अचानक आग लागल्याचे दिसून आले. काही क्षणातच आगीने  रुद्र रूप धारण केले. प्रचंड असे आगीचे तांडव सुरू झाले.  या ठिकाणी कारखान्याचा सुमारे बारा ते पंधरा हजार मे. टन बगॅस  साठवून ठेवण्यात आले होते. 

हा बगॅस कारखाना, को- जनरेशन व डिस्टिलरी प्रकल्प सुरू असल्याने  योग्य ठिकाणी आणण्याचे काम सुरू होते. याकरिता मोठा पोकलेन मशीन काम करीत होता. त्याचठिकाणी उन्हाच्या उष्णतेमुळे स्पार्किंग होऊन मोठ्या प्रमाणात आगीचे तांडव सुरू झाले.  हा आगीचा तांडव विझवण्याकरिता पांडुरंग कारखान्याकडे स्वतःचे असणारी अग्निशामक यंत्रणा, त्याचबरोबर श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना लि,माढा, सहकार महर्षी शंकरराव मोहीते-पाटील सहकारी साखर कारखाना लि,शंकरनगर, विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि,वेणूनगर व माळीनगर साखर कारखाना यांनी अथक परिश्रम करून सदरची आग काबूमध्ये आणण्याचा प्रयत्न केला व त्यामुळे सुमारे आठ ते दहा हजार मे.टन बगॅसचे डेपो वाचवण्यामध्ये कारखान्यास यश आले. 

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेऊन सदरची आग आटोक्यात आणली.  तरीदेखील या भीषण आगीमध्ये सुमारे चार हजार मे.टन बगॅस जळून कारखान्याचे नुकसान झाले आहे.  यावेळी श्री पांडुरंग कारखान्याने ही आग यशस्वीपणे सर्व कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या सहकार्याने विझवली.  म्हणून अग्निशामक दलाचे कर्मचारी यांना कारखान्याने बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला. कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक,  व्हा. चेअरमन कैलास खुळे त्याचबरोबर दिनकरराव मोरे व संचालक मंडळ यांनी घटनास्थळाला भेट दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!