फिनिक्स इंग्लिश मिडीयम स्कूलची पालक सभा खेळीमेळीत संपन्न.
पालक संघाचे अध्यक्षपदी रामचंद्र चांगदेव चव्हाण,उपाध्यक्ष रेवण लक्ष्मण भोळे

अकलूज दि.१२ (केदार लोहकरे)माळशिरस तालुक्यातील लवंग २५/४ येथील फीनिक्स इंग्लिश स्कूलच्या वतीने आयोजित केलेली पालक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.या वेळी शाळेच्या संचालिका नूरजहाँ फकृद्दिन शेख शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष समाधान जगताप,उपाध्यक्ष दशरथ दगडे यांनी विद्येची आराध्य दैवत सरस्वती , क्रांतीसुर्य म. ज्योतिबा फुले , क्रांतिज्योती सावित्रीाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले .,त्यानंतर उपस्थित पालकांचे स्वागत करण्यात आले .
यावेळी शाळेच्या संचालिका सौ.नूरजहाँ शेख या आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की,आपला विद्यार्थी उद्याचा आदर्श नागरिक बनण्यासाठी प्रमाणीकपणा हा गुण त्याच्या अंगी रुजवण्यासाठी बाल वयातच पालक आणि शिक्षक यांनी प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येक पालकाला आपला मुलगा टॉपर,ऑल राऊंडर असावा असे वाटते.परंतु हे गुण साध्य करण्यासाठी नियमित अभ्यास करणे ,प्रयत्नशील राहणे.हे गुण मुलांच्या अंगी असणे आवश्यक आहे.यासाठी पालकांनी आपल्या पल्याच्या उज्वल भवितव्यासाठी रोजच्या रोज आपल्या मुलांकडून शाळेतील अभ्यास करून घ्यावा.यामुळे विद्यार्थ्यांना मनन करण्याची सवय लागेल आणि आपसूकच मुले चिंतन करतील अभ्यासाविषयी गोडी निर्माण होईल.आणि नक्कीचं विद्यार्थी स्वयंप्रेरणेने प्रेरित होऊन यश संपादन करतील.
चालू शैक्षणिक वर्षाचे पालक संघाचे अध्यक्षपदी रामचंद्र चांगदेव चव्हाण,उपाध्यक्ष रेवण लक्ष्मण भोळे तसेच महिलांमधून सौ.रुपाली पृथ्वीराज मिटकल यांची निवड करण्यात आली. पुष्पहार,गुलाबपुष्प व श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.सहकारी शिक्षिका गुलशन नशीब शेख यांनाही सन्मानित करण्यात आले.