महाराष्ट्र

सेंद्रिय शेतीसाठी उत्कृष्ट गांडूळ खत – अनिल काळे, कृषी अभ्यासक | Organic Farming

महाळुंग  येथे ' कृषिकन्यांनी' दाखवले गांडूळ खत निर्मितीचे प्रात्यक्षिक

महाळुंग  येथे ‘ कृषिकन्यांनी’ दाखवले गांडूळ खत निर्मितीचे प्रात्यक्षिक (Demonstration of vermicomposting production by ‘Krishikanyas’ at Mahalung)

श्रीपूर प्रतिनिधी : महाळुंग तालुका माळशिरस येथे ‘रत्नाई कृषी महाविद्यालय, अकलूज’ मधील ‘कृषिकन्यांनी’, महाळुंग मधील शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करीत असताना रासायनिक खताचा वापर कमी करून, सेंद्रिय शेती करण्यासाठी महत्त्वाचे असणारे  गांडूळ खत, त्याची निर्मिती,  महत्व, त्या खतापासून पिकविली जाणारे पिके आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, शिवाय या खतासाठी खर्च अत्यंत कमी येतो. शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करून शेतकऱ्यांनी गांडूळ खत निर्मितीची नामीयुक्ती साधावी. गांडूळ खतामुळे भरघोस उत्पन्नाची हमी देता येते, असे अनमोल मार्गदर्शन रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूजच्या ‘कृषिकन्यांनी’ महाळुंग  येथे केले व या ‘कृषिकन्यांनी’ गांडूळ खत निर्मितीचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये करून दाखविले.

रत्नाई कृषी महाविद्यालयातील कृषिकन्यांचा ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम, प्राचार्य आर. जी. नलावडे, समन्वयक एस. एस. एकतपुरे यांच्या मार्गदर्शना खाली महाळुंग येथे आयोजित केला आहे. 

ग्रामीण कृषी कार्यानुभव, उपक्रमांच्या माध्यमातून प्रशिक्षण व कृषी मार्गदर्शन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले. याचे प्रात्यक्षिक दाखवून खताचे महत्व  सांगण्यात आले. यावेळी कृषी अभ्यासक अनिल काळे यांनी कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी गांडूळ खत फायदेशीर असल्याचे सांगितले. यावेळी ‘कृषिकन्या’ दिपाली माने, नेहा धापटे, प्रतिक्षा वाघमारे, रोशनी पवार, साक्षी माळी, सिद्धी लोंढे, शीतल आंधळे, साक्षी सरडे, वैष्णवी पाटील, वैष्णवी जगताप व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!