सांगलीच्या विश्वेश्वरय्या टेक्निकल कॅम्पसच्या संचालकपदी डॉ.इंद्रजीत यादव यांची नियुक्ती.
आयडॉल ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित आहेत

आयडॉल ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित आहेत
सांगली (प्रतिनिधी) तंत्र शिक्षण तळागाळात पोहोचण्याचा जागर घेतलेले एक युवा नेतृत्व,२० विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित,शिक्षण क्षेत्रातील विविध समित्या व त्याच बरोबर विविध कंपनी व संस्थांच्या सल्लागारपदी कार्यरत असलेले डॉ.इंद्रजीत यादव यांची विश्वेश्वरय्या टेक्निकल कॅम्पसच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे.
शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना आयडॉल ऑफ महाराष्ट्र हा सुद्धा पुरस्कार देऊन करण्यात आलेले आहे. त्याच बरोबर ५० पेक्षा जास्त शोध निबंध व विद्यार्थ्यांना प्रकल्प मार्गदर्शन,५ पेटंट व १५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पीएचडीचे मार्गदर्शक म्हणून काम पाहिलेले आहे.३० पेक्षा जास्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समित्या व इंटरनॅशनल जर्नल याचेही ते काम करत आहेत.परिणामावर आधारित तंत्रशिक्षण व नवीन शैक्षणिक धोरणाची सांगड घालून समाजातील विविध घटकातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना तंत्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी प्रयत्नशील डॉ.इंद्रजीत यादव यांचा फायदा संस्थेला नक्कीच होईल अशी आशा संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव इंगोले व सचिव सतीश इंगवले यांनी व्यक्त केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये परिसरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.