आमदार अभिजीत पाटील यांच्या शुभहस्ते MDMA च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
महा डिजिटल मीडिया असोसिएशन 2025 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन नागपूर येथे करण्यात आले

नागपूर : माढा विधानसभेचे आमदार अभिजीत(आबा) पाटील यांच्या शुभहस्ते नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन दरम्यान विधान भवन परिसरा मध्ये महा डिजिटल मीडिया असोसिएशन (MDMA) सन 2025 च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संस्थापक-सचिव एडवोकेट अद्वैत चव्हाण, राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रय नाईकनवरे, प्रदेशाध्यक्ष विनायकराव शिंदे, खजिनदार महादेव हरणे, सहसचिव प्राध्यापक बाळासाहेब माघाडे, पी.ए. शुभम बोबडे व इतर डिजिटल मीडियाचे पत्रकार उपस्थित होते.
यावेळी डिजिटल मीडियातील पत्रकारांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. येणाऱ्या अधिवेशन कालावधीमध्ये डिजिटल मीडियातील पत्रकारांच्या प्रश्नांचा आवाज उठवणार असे देखील त्यांनी आश्वासन दिले. तसेच महा डिजिटल मीडिया असोसिएशनचे सर्व पदाधिकारी मुंबई मंत्रालयामध्ये संबंधित विभागाच्या मंत्र्यांना भेटून डिजिटल मीडियातील पत्रकारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबई येथे जाणार आहेत. अशी माहिती संस्थापक एडवोकेट अद्वैत चव्हाण यांनी दिली.
महा डिजिटल मीडिया असोसिएशन डिजिटल मीडियातील पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी व त्यांना मोफत डिजिटल मीडियाचे प्रशिक्षण देणारी संघटना गेले अनेक वर्षापासून कार्यरत आहे.