श्रीपूर ब्रिमा सागर कारखान्याचे भजनी मंडळ राज्यात तिसरे | Bhajani Mandal | Shreepur
२९ व्या महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ भजन स्पर्धा 2025

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेत श्रीपूरचा ब्रिमा सागर कारखाना भजनी मंडळ राज्यात तिसरे !
श्रीपूर प्रतिनिधी : सोलापूर जिल्हास्तरीय स्पर्धेमधून प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कामगार भजन स्पर्धेत श्रीपूर तालुका माळशिरस येथील ब्रिमा सागर महाराष्ट्र डिस्टलरीज लिमिटेड श्रीपुर कारखान्याच्या कामगार भजनी मंडळाने नाशिक येथे झालेल्या २९ व्या भजन स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला आहे. सदर कामगार भजनी मंडळात डि.बी. कुलकणीॅ, सुनिल मदाल, भारत मोरे, संजय यादव, विठ्ठल कदम, सुनील गोसावी, नानासाहेब केचे, रामकृष्ण गवळी, दावल शिवशरण, प्रसाद कोकीळ, नामदेव जाधव, गणेश विभुते यांनी मंडळाला यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. सदर ब्रिमा सागर कारखाना कामगार भजनी मंडळाला सोलापूर जिल्हा कामगार कल्याण मंडळ अधिकारी तालीकोटी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
भजनी मंडळाने घवघवीत यश मिळवल्याबद्दल ब्रिमा सागर कारखान्याचे डायरेक्टर उदय कोठारी, डायरेक्टर भरतकुमार शेठीया, कारखान्याचे जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर, डेप्युटी मॅनेजर चंद्रकांत भागवत , नरेश पाठक, सुरक्षा अधिकारी भागवत पारसे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.