महाराष्ट्र

माती परीक्षणाविषयी कृषी कन्यांनी महाळुंग मध्ये केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

मातीतील विविध घटकांची माहिती मिळते

कृषी क्रांतीसाठी माती परिक्षण काळाची गरज

श्रीपूर प्रतिनिधी : महाळुंग तालुका माळशिरस येथे शेतातील माती परिक्षण दर सहा महिन्यांनी केले पाहिजे. माती परिक्षणामुळे मातीतील घटकांची कमतरता समजून येते. यामुळे माती परिक्षण काळाची गरज बनली आहे. परिणामी माती परिक्षणातून उत्पादन वाढ झाल्याने कृषी क्रांती होईल, असे प्रतिपादन महाळुंग येथे कृषी कन्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले. 

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहीते-पाटील, रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर जी नलावडे, प्रा. एस एम एकतपुरे (कार्यक्रम समन्वयक), प्रा एच व्ही कल्याणी (कार्यक्रम अधिकारी) तसेच विषय शिक्षक प्रा एस आर अडत यांच्या मार्गदर्शनानुसार शेतकर्यांना मातीचा नमुना कसा घ्यावा, कोणत्या ठिकाणी घ्यावा, उत्पादकता वाढविण्यासाठी करायचे उपाय, आवश्यक अन्नघटक व त्यांच्या कमतरतेमुळे पिकांवर दिसणारी लक्षणे या विषयी प्रात्यक्षिक घेऊन मार्गदर्शन केले. यामधे त्यांनी माती, मातीचे प्रकार,आढळणारी पोषक द्रव्ये त्यांच्या कमतरतेचे पिकांवरती होणारे परिणाम, त्यातून उत्पादनात होणारी घसरण, शेतीप्रणालीतील बदलांमुळे जमानीची होणारी धूप,  त्यासाठी मृदा संवर्धनाचे उपाय आणि पिक निहाय खत व्यवस्थापनासाठी माती परिक्षणाचे महत्त्व अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करून मृदा परिक्षण केले. 

यावेळी दिपाली माने, प्रतिक्षा वाघमारे, साक्षी सरडे, शितल आंधळे , रोशनी पवार, नेहा धापटे, वैष्णवी पाटील, वैष्णवी जगताप, साक्षी माळी व सिद्धी लोंढे या कृषी कन्या उपस्थित होत्या. तसेच गोरख सावंत, भरत काळे, प्रितम मांडवे, डॉ.संजय लाटे हे शेतकरी बांधव उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!