महाराष्ट्र

ग्रामस्थ व भाविकांच्या सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया | यमाईदेवी मंदिरासमोर रस्त्यावर भाविकाची गाडी गेली खड्ड्यात

महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत लगत, मंदिरासमोर निकृष्ट रस्त्यावर भाविकाची गेली गाडी खड्ड्यात

संबंधित कामाबाबत एक वर्षापूर्वी दिले होते निवेदन, अधिकारी व लोकप्रतिनिधींना, कोणाला काही देणे घेणे नाही… 

श्रीपूर : महाळुंग ता.माळशिरस येथे यमाई देवीचे पुरातन खात्याच्या ताब्यात असलेले मंदिर आहे.  गावातील भाविक भक्तांची व सर्वांची देवीवर मोठे श्रद्धा आहे. बाहेरील भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने रोज येत असतात. मंदिरासमोरील रस्ता व त्या ठिकाणच्या गटारी वरती केलेले काम हे निष्क्रिय झाल्यामुळे, गटारीवरील रस्त्यावरून भाविक भक्तांच्या छोट्या-मोठ्या गाड्या गेल्यानंतर मोठे खड्डे पडले जाऊ लागले आहेत. अशातच काल एका भक्ताची गाडी या खड्ड्यामध्ये अडकली.  स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने गाडी सुखरूप बाहेर काढण्यात आली.

अशा अनेक घटना गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी होत आहेत असे तेथील ग्रामस्थांनी सांगितले. स्थानिक ग्रामस्थांना व भाविकांना याचा मोठा त्रास व मनस्ताप होत आहे. भाविकांनी याबाबत संबंधित  प्रशासनाकडे बोट दाखवत टीका केली.

3 एप्रिल 2024 रोजी स्थानिक ग्रामस्थ व यमाईदेवीभक्तांनी याबाबत महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीकडे सदर रस्ता व गटार दुरुस्त करण्यासंदर्भात निवेदन दिले होते. परंतु संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे निवेदनाची दखल न घेतल्यामुळे.  सदर ठिकाणच्या गटारीला व रस्त्याला दिवसेंदिवस मोठ-मोठे खड्डे, भगदाडे पडू लागले आहेत. आठवडे बाजार याच ठिकाणी बुधवारी भरत असतो,  हजारोच्या संख्येने ग्राहक, स्थानिक नागरिक या बाजारामध्ये येत असतात.  त्यांना देखील या खड्ड्यांचा मोठा त्रास होत आहे,  येणाऱ्या व्यापाऱ्यांना विक्रेत्यांना आपली दुकाने या खड्ड्यांमुळे नीट मांडता येत नाहीत. याची तात्काळ दखल घेऊन संबंधित विभागाने ताबडतोब त्या ठिकाणी पक्के अंडरग्राउंड गटार व रस्ता करण्याची मागणी, स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे.

सदर घटनेचे सोशल मीडियावर फोटो वायरल झाले,  सोशल मीडियावरती संतप्त प्रतिक्रिया भाविक आणि स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत त्यापैकी एक प्रतिक्रिया खाली वाचण्यासाठी देत आहे.

ग्रामस्थ व भाविकांच्या संतप्त सोशल मीडियावर प्रतिक्रिया

“अहो कोणाला काय करायचंय….भागतय ना सगळ्यांच…जो तो आपआपल्या भागाचा विकास करतोय..पण ज्या कारणांमुळे गावाला ओळखलं जातं..ज्या गोष्टीमुळे गाव आहे त्या श्री यमाई देवी मंदिराची सुधारणा नाही..ना मंदिरा भोवतीच्या परिसराची सुधारणा नाही…गेले 6 वर्षापासून बोंबलतोय साधं शौचालय,  मुतारी सुध्दा बांधली नाहीये…पुरूष जातील कुठेही पण स्त्रियांना वाॅशरूमची सोय नाही..आणि हा मकर संक्रांती दिवशी घडलेला प्रकार ही काय पहिली गाडी नव्हती अशा किती तरी गाड्या या मंदिरा समोरील खड्यात गेल्यात आणि त्या आम्हीच काढल्यात.. गेल्या 2 वर्षापूर्वी मंदिरा समोरून एक पिकप वाल्याने एक माकडच पिल्लू पळून नेलं गाड्यांनवर पाठलाग करून धरायचा प्रयत्न केला होता आम्ही पण नाही सापडला तो ..त्याच्या आधी पासुन  सांगत होतो CCTV कॅमेरे लावा पण नाही या गावाला जिथं तिथं राजकारण करायची अतीघाण सवय आहे .. एक जरी कॅमेरा असता तर गाडीचा नंबर तरी सापडला असता…आणि हो जर आधी पासून कॅमेरे असते तर मंदिरात जी चोरी झाली तो चोर सापडला असता .. चोर सोडा अहो चोरीच झाली नसती…सगळ्यांचाच भोंगळा कारभार..जो तो आपलं भरण्याच्या नादात आहे..यांना काय पडलयं मंदिरा समोरची सुधारणा करायची..मंदिरा समोरील श्री राम मंदिरा समोरचा रस्ता येऊन बघा किती खराब झालाय कित्येक जन पडलेत तेथे ते नाही काम करायचं पण… इथे मात्र आमचा नेता असा,तुमचा नेता तसा, माझ्या नेत्याची जास्त लाल,का तुझ्या नेत्याची जास्त लाल,हेच चाल्लय या लोकसभा निवडणुकीपासुन…इथे फक्त ज्याला त्याला श्रेय पाहिजे श्रेय. विकास गेला गाढवाच्या गा……..मि त्या सगळ्यांना सांगतोय ज्यांची हे वाचुन जळणारा आहे काम करा लुडुबुडु करू नका नेत्यांच्या नादात स्वतःचा स्वाभिमान घाण ठेऊ नका…सत्य परिस्थिती सांगितली, कोणला वाईट वाटलं असेल तर “माफ करा ”–सोशल मीडिया संतप्त स्थानिक भक्ताची प्रतिक्रिया.

भविष्यात दर्शनासाठी व आठवडे बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या स्थानिक नागरिकांना या खड्ड्यांमुळे अपघात होऊन आपला जीव गमावा लागणार आहे.  वेळीच नगरपंचायतीने तात्काळ निवेदा काढून सदर ठिकाणी दुरुस्ती करणे आवश्यक आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!