श्रीपूर पोलीस दूरक्षेत्र (पोलीस स्टेशनचे) नवीन जागेमध्ये स्थलांतर | Shreepur, Police Station(Outpost)
लवकरच एस पी साहेबांच्या हस्ते उद्घाटन होणार | आता श्रीपूर-महाळुंग रोड वरती सुरू केले श्रीपूर दूरक्षेत्र पोलीस स्टेशन

पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे साहेबांनी मनावर घेऊन, जागा शोधून, नवीन जागेमध्ये कामकाज केले सुरू.
श्रीपूर तालुका माळशिरस येथील श्रीपूर आउट पोस्ट पोलीस स्टेशनला गेले अनेक वर्षापासून कमी जागेमध्ये आपले कार्यालय व त्यामधून कामकाज पहावे लागत होते. अनेक अडचणी येत होत्या. पण एक सक्षम अधिकारी येतो आणि तिथली अडचण कायमस्वरूपी दूर करण्याची इच्छाशक्ती आणि प्रयत्न करतो, त्याच वेळेला त्याला यश येते, असेच अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे साहेबांनी श्रीपूर आऊट पोस्ट पोलीस स्टेशन साठी जागा शोधली, महाळुंग-श्रीपूर रोड वरती सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गट सेंटरच्या बाजूलाच सध्या नवीन श्रीपूर पोलीस दूरक्षेत्र पोलीस स्टेशन स्थलांतरित करण्यात आलेले आहे.
दगडी बांधकाम, पाच ते सहा मोठ्या खोल्या, रंगरंगोटी करून खोल्या तयार केल्या, बगीचा करून श्रीपूर पोलीस स्टेशन करण्यात आलेले आहे. पुढे मोकळे मैदान असलेली प्रशस्त अशी जागा, भारदस्त बिल्डिंग, त्या जागेच्या संबंधितांशी करार करून सदर पोलीस स्टेशन पहिल्या जागेवरून महाळुंग-श्रीपूर रोड वरती सहकार महर्षी साखर कारखान्याच्या गट सेंटर जवळ स्थलांतरित करण्यात आलेले आहे.
यामध्ये अधिकाऱ्यांसाठी वेगळे कक्ष, विश्रांतीसाठी स्वतंत्र खोली, लाईट ,पाणी, टॉयलेट, बाथरूम. त्याचबरोबर जप्त केलेला माल ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली. अशाप्रकारे सर्व सुविधांनी युक्त असे हे श्रीपूर पोलीस दूरक्षेत्र करण्यात आलेले आहे.
या ठिकाणी एपीआय विक्रम साळुंखे, एएसआय बाळासाहेब पानसरे, पोलीस हवलदार किशोर गायकवाड, पोलीस नाईक दर्लिंग गुरव, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पवार आणि इतर कर्मचारी सध्या काम पाहत आहेत.
श्रीपूर दुरक्षेत्र पोलीस स्टेशनच्या जागेचे स्थलांतर व दुसऱ्या नवीन जागेमध्ये पोलीस स्टेशन सुरू करणारे अधिकारी म्हणून, अकलूज पोलीस स्टेशनचे , पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे साहेब, यांच्या नावाची इतिहासामध्ये नोंद होणार आहे.
“लवकरच सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या शुभ हस्ते, त्यांची तारीख घेऊन उद्घाटन करण्यात येणार आहे.”- भानुदास निंभोरे, पोलीस निरीक्षक-अकलूज पोलीस स्टेशन.