न्यू डायमंड स्कूल, श्रीपूर मध्ये जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धा संपन्न
शिवशंभो इंग्लिश मीडियम स्कूल, वेळापूरला मिळाला प्रथम क्रमांक

श्रीपूर तालुका माळशिरस येथील पांडुरंग बहुउद्देशीय संशोधन संस्था संचलित न्यू डायमंड स्कूल च्या वतीने जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते. सदर स्पर्धेत माळशिरस, माढा, पंढरपूर, आणि सांगोला तालुक्यातून अनेक शाळांनी सहभाग घेतला होता.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि स्टेज पूजन करून समूह नृत्याला सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यातून समाज प्रबोधनात्मक विशेष संदेश देण्याचा प्रयत्न केला . यावेळी संस्थापक हेमंत बरडे, सचिव रोहिणी बरडे, दत्तात्रय पवार ,संजय मोहिते, देवकते मॅडम , नानासाहेब मुंडफणे, जीवन मोहिते, दत्तात्रय नाईकनवरे उपस्थित होते.
समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक शिवशंभो इंग्लिश मीडियम स्कूल,वेळापूर, द्वितीय क्रमांक ब्रह्मचैतन्य इंग्लिश मीडियम स्कूल, तांदुळवाडी आणि तृतीय क्रमांक ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, बोंडले यांना मिळाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या सचिव रोहिणी बरडे यांनी केले, आणि सूत्रसंचालन रुक्साना डांगे आणि आभार पूजा बोरकर यांनी मांनले. कार्यक्रमाचे अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन न्यू डायमंड स्कूलच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.