बँकेने दिले लक्षात आणून, विमा कंपनीने दिले वारसांना विम्याचे पैसे
बँकेच्या शाखाधिकार्याने खातेदाराच्या वारसाला मिळवून दिली विम्याची रक्कम

विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा श्रीपूर | शाखाधिकारी सागर कदम यांचे होत आहे कौतुक
श्रीपूर तालुका माळशिरस येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक, श्रीपूर शाखेमध्ये मिरे येथील कै.सोमनाथ अभिमान गायकवाड यांचे सेविंग खाते होते. त्यांचा अपघात होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचे वारस विनय सोमनाथ गायकवाड यांनी वडिलाचे सेविंग खात्या मधील पैसे काढण्यासाठी बँकेमध्ये आल्यावर बँकेचे शाखाधिकारी सागर कदम साहेबांनी सदर खात्याला विमा लागू आहे हे लक्षात आणून दिले. त्या संबंधित क्लेमची पूर्तता करून कागदपत्रे संबंधित विमा कंपनीला पाठवून दिली आणि क्लेम मंजूर झाला. विमा कंपनीकडून शाखाधिकार्यांच्या हस्ते कै. सोमनाथ गायकवाड यांच्या वारसांना दोन लाख रुपयाचा चेक देण्यात आला.
याबद्दल बँकेचे शाखाधिकारी सागर भागवत कदम, असिस्टंट मॅनेजर रामचंद्र बनकर, कॅशियर गोविंद सिंग आणि ऑफिस अटेंडंट तय्यब शेख यांचे गायकवाड परिवाराकडून आभार मानण्यात आले.
“प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा वार्षिक 436 रुपये व प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना योजने अंतर्गत वार्षिक 20 रुपये हप्ता भरणाऱ्या खातेदाराचा अपघात होऊन अपंगत्व आले किंवा त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या वारसाला दोन लाख रुपये विमा कंपनीकडून दिले जातात. संबंधित खातेदारांनी याबाबत जागृत होऊन आपले विमा हप्ते भरून विमा संरक्षण सुरू करून घ्यावे. तसेच जनधन योजने अंतर्गत शून्य बॅलन्स वरती खाते उघडले जाईल व नॉर्मल खाते पाचशे रुपये रक्कम ठेवून उघडले जाईल.” अशी माहिती शाखाधिकारी सागर कदम यांनी दिली.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेबद्दल केंद्र सरकारच्या पोर्टलवर दिलेली माहिती पुढील प्रमाणे
विमा तपशील : अपघात विमा योजना जी अपघातामुळे झालेल्या मृत्यू किंवा अपंगत्वासाठी अपघाती मृत्यू आणि अपंगत्व संरक्षण देते.
प्रीमियमः प्रति सदस्य दरवर्षी रु. २०/-. योजनेअंतर्गत प्रत्येक वार्षिक कव्हर कालावधीच्या १ जून रोजी किंवा त्यापूर्वी ‘ऑटो डेबिट’ सुविधेद्वारे खातेधारकाच्या बँक/ पोस्ट ऑफिस खात्यातून प्रीमियम कापला जाईल.
कव्हरेज कालावधी: वार्षिक प्रीमियम भरल्यानंतर PMJJBY अंतर्गत कव्हर १ जून ते ३१ मे पर्यंत एक वर्षासाठी वैध आहे.
अपघात कव्हर विमा समाप्ती: सदस्याचे अपघात विमा खालीलपैकी कोणत्याही घटनेवर त्यानुसार समाप्त होईल / मर्यादित केले जाईल:
- वयाच्या ७० व्या वर्षी (जन्मदिवसाच्या जवळचे वय).
- बँकेतील खाते बंद करणे किंवा विमा चालू ठेवण्यासाठी अपुरी शिल्लक.
जर एखाद्या सदस्याला एकापेक्षा जास्त खात्यांद्वारे पीएमएसबीवाय अंतर्गत संरक्षण मिळाले असेल आणि विमा कंपनीला अनवधानाने प्रीमियम प्राप्त झाला असेल, तर विमा संरक्षण २ लाख रुपयांपर्यंत मर्यादित असेल.
फायदे : मृत्यूनंतर- नामनिर्देशित व्यक्तीला २ लाख रुपये मिळतील.
- दोन्ही डोळ्यांचे संपूर्ण आणि न भरून येणारे नुकसान किंवा दोन्ही हात किंवा पायांचा वापर गमावणे किंवा एका डोळ्याची दृष्टी गमावणे आणि हात किंवा पायाचा वापर गमावणे – सदस्याला २ लाख रुपये मिळतील.
- एका डोळ्याची दृष्टी पूर्णपणे आणि भरून न येणारी हानी किंवा एका हाताचा किंवा पायाचा वापर कमी झाल्यास – ग्राहकाला १ लाख रुपये मिळतील.
पात्रता : सहभागी बँकांच्या १८ वर्षे (पूर्ण) आणि ७० वर्षे (वाढदिवसाच्या जवळचे वय) वयाच्या वैयक्तिक बँक खातेधारकांना, जे स्वयं- डेबिटमध्ये सामील होण्यास / सक्षम करण्यास संमती देतात, त्यांना या योजनेत नोंदणीकृत केले जाईल.