श्रीपूर मध्ये रास्ता रोको | सकल मराठा समाज महाळुंग-श्रीपूर कडून रास्ता रोको
काही काळ चक्काजाम | वाहतूक ठप्प | वाहनांच्या लांब पर्यंत रांगा |

श्रीपूर मध्ये रास्ता रोको | काही काळ चक्काजाम | वाहतूक ठप्प | वाहनांच्या लांब पर्यंत रांगा | सकल मराठा समाज महाळुंग-श्रीपूर | मराठा बांधवांकडून रास्ता रोको
श्रीपूर तालुका माळशिरस येथील सखल मराठा समाज बांधव महाळुंग-श्रीपूर आणि माळशिरस तालुक्यातील मराठा बांधवांकडून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी, ओबीसी मधूनच 50% च्या आत सुप्रीम कोर्टात टिकणारे आरक्षण देण्यासंदर्भात, सगेसोयरे याच्या व्याख्या शासनाने स्पष्ट कराव्यात अशा मागण्यांसाठी श्रीपूर मध्ये रस्ता रोको करण्यात आला.
यावेळी जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा सकल मराठा बांधवांकडून रस्ता रोको दरम्यान घोषणा देण्यात आल्या.
श्रीपूर ही सर्वात मोठी पूर्व भागातील बाजारपेठ आहे.. अकलूज मुख्य बाजारपेठेत देखील याच श्रीपूर मार्गे मुख्य रस्ते जात असतात. छत्रपती शिवाजी महाराज चौक हा श्रीपूर मधील मुख्य चौक आहे. या चौकामध्ये रस्ता रोको केल्यामुळे चारी रस्त्यावरती लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अकलूज-श्रीपूर पोलीस स्टेशन कडून रास्ता रोको साठीचा व वाहतुकीचा बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
महाळुंग,अकलूज,बोरगाव, डी १९, पंढरपूर या रस्त्यांवरती लांब पर्यंत रास्ता रोको मुळे वाहनाच्या रांगा लागलेल्याचे चित्र दिसून आले. या काळामध्ये विद्यार्थ्यांची स्कूल बस आल्यानंतर तिला वाट करून देण्यात आली व एक आजारी रुग्ण गाडीमधून अकलूज येथे दवाखान्यात घेऊन जात होते त्या गाडीला देखील वाट करून देण्यात आली आणि रस्ता रोको पुढे चालू ठेवण्यात आला. यावेळी पोलीस प्रशासनाला मराठा बांधवांकडून मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्याचे निवेदन देण्यात आले.