जि. प. शाळा ते एम.बी.बी.एस. चा अमृता भोसले चा शैक्षणिक प्रवास
M.B.B.S प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

M.B.B.S प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
बोरगाव तालुका माळशिरस सेक्शन 11 येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगाशेनगर-वाडी बंगला इथून शिक्षणाची सुरुवात केलेल्या अमृताने आज आपले एमबीबीएस चे शिक्षण प्रथम श्रेणीत पूर्ण करून ग्रामीण भागातील मुली सुद्धा कुठे कमी नाहीत हा एक सर्वांपुढे आदर्श निर्माण केला आहे. हिच्या या यशाबद्दल परिसरात तिचे कौतुक करून अनेक ठिकाणी सत्कार देखील केले जात आहेत. अमृता ही दि मॉडेल हायस्कूल माळीनगर येथे शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या बी.एम. भोसले सरांची कन्या. तिची आई रेखा भोसले या जिल्हा परिषद शाळा बोरगांव येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. दोघांनीही आपल्या दोन मुली उच्च शिक्षित केल्या आहेत.
बोरगांव (सेक्शन-११) येथील अमृता बाळासाहेब भोसले हिने अथक परिश्रम घेवून डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महविद्यालय सोलापूर येथून एम. बी. बी. एस चे शिक्षण प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे. तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वाडीबंगला (आगाशेनगर) येथे तर माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थचे श्री नाथ विद्यालय, बोरगांव येथे पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण सद्गुरू गाडगेबाबा कॉलेज कराड येथून पूर्ण करून नीट परिक्षेसाठी लातूर येथे क्लास करूने शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला व डॉ. वैशंपायन शासकीय महाविद्यालयात M. B.B.S चे शिक्षण प्रथम श्रेणीत झाली आहे.
तिच्या यशामुळे ग्रामीण भागातील व जिल्हा परिषद शाळेतील गरीब सामान्य मुलांना सुद्धा यामुळे प्रेरणा मिळेल व ते सुद्धा कष्ट करून यश मिळवतील.