महाराष्ट्र
अकलूजला पूर्णवेळ प्रांताधिकारी मिळाले | Akluj Prant | Namdeo Tilekar
नामदेव टिळेकर यांची झाली नियुक्ती

नामदेव टिळेकर (Namdeo Tilekar) यांची झाली नियुक्ती
अकलूज तालुका माळशिरस येथील (प्रांत) उपविभागीय अधिकारी माळशिरस या रिक्त पदावर बीडचे प्रांत अधिकारी नामदेव टिळेकर (Namdeo Tilekar) यांची बदली करून अकलूजच्या प्रांत अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नामदेव टिळेकर हे पूर्णवेळ प्रांत अधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत.
या अगोदर उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख यांच्या नंतर, मंगळवेढा उपविभागाचे प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर यांच्याकडे काही महिने पदभार होता. सध्या माढा कुर्डुवाडी प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्याकडे पदभार होता. अनेक महिने उलटून गेले तरीसुद्धा माळशिरस उपविभागाला कायमस्वरूपी प्रांताधिकारी मिळाले नव्हते. म्हणून महसूल विभागाने पूर्णवेळ नामदेव टिळेकर यांची बीडहून बदली करून अकलूज प्रांत पदी नियुक्ती केली आहे.