चोर पकडणे अकलूज-श्रीपूर पोलिसांपुढे मोठे आव्हान | DP Oil Chor
रोड लगत तीन ट्रान्सफॉर्मर मधील ऑइल केले रातोरात गायब | DP Oil Chor

आता चोरांचा शेतकऱ्यांच्या शेतीपंप डीपी वर डल्ला
रोड लगत तीन ट्रान्सफॉर्मर मधील ऑइल केले रातोरात गायब | DP Oil
श्रीपूर तालुका माळशिरस येथे गेले दोन दिवसापासून रानामध्ये शेती पंपासाठी असणारे विजेचे ट्रान्सफॉर्मर (DP) मधील रात्री ऑइल चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. लाला जाधव, शेती पंप डीपी अकलूज-श्रीपूर रोड, हाके शेती पंप डीपी महाळुंग-मुंडफणे वस्ती रोड, सूर्यवंशी शेती पंप डीपी, महाळुंग-मुंडफणे वस्ती रोड या तिन्ही ट्रान्सफॉर्मर मधील अज्ञात चोरट्याने ऑइल चोरल्याची घटना घडली आहे. ट्रान्सफॉर्मर (DP) मध्ये ऑइल नसल्यामुळे तीनही ट्रान्सफॉर्मर (DP) जळाले आहेत. दोन दिवसापासून सदर शेतकऱ्यांच्या पिकांसाठी ट्रान्सफॉर्मर (DP) जळाल्यामुळे, लाईट नसल्यामुळे उभी पिके जळू लागली आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला पिकांना मोठा फटका बसणार असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी सांगितले की, “साधारण 200 लिटर ऑइल एका डीपी मध्ये असते. याची बाजारात एका लिटरला 110 रुपये प्रमाणे किंमत असते. साधारण एका डीपीमधील 21000 ते 22000 रुपयाचे तेल अज्ञात चोरांनी चोरून नेले आहे. असे तीनही डीपीचे मिळून 65 हजाराचे आसपास या परिसरामध्ये ट्रान्सफॉर्मर (DP) मधील तेल अज्ञान चोरट्याने चोरल्यामुळे महावितरणचे व संबंधित शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याबाबत शेतकरी व महावितरण कंपनीकडून संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार देऊन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.”
सदर चोरटे रोड लगत असणारे ट्रान्सफॉर्मर हेरतात. चार चाकी गाडीमध्ये मोठा बॅरेल घेऊन येतात, ट्रान्सफॉर्मर वरील तारा बांधलेल्या कपा खालची नट बोल्ट काढून त्या ठिकाणच्या होलमध्ये पाईप घालून, तेल गाडी मधील बॅरेल मध्ये ओढून घेतात आणि काही मिनिटातच पसार होतात. शेतामधील केबल, ट्रान्सफॉर्मर, तेल, तारा, स्टार्टर या साहित्यांच्या चोऱ्या परिसरामध्ये अनेकदा घडलेल्या आहेत, अशी माहिती संबंधित शेतकऱ्यांनी दिली आहे. अशा प्रकारचे चोर पकडणे अकलूज-श्रीपूर पोलिसां पुढे मोठे आव्हान ठरत आहे.