आता 10 गुंठे बागायती आणि 20 गुंठे जिरायती जमीनीची होणार खरेदी विक्री
शासनाच्या महसूल व वन विभागाची अधिसूचना केली जारी

आता दहा गुंठे बागायती आणि वीस गुंठे जिरायती जमीनीची होणार खरेदी विक्री
शासनाच्या महसूल व वन विभागाची अधिसूचना केली जारी
महसूल व वन विभागाचे राजपत्र
राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने 8 ऑगस्ट 2023 रोजी या संदर्भातील राजपत्र जारी करण्यात आले असून महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती यांची हद्द वगळून सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यासाठी हा आदेश लागू करण्यात आला आहे.
सोलापूर : शासनाने तुकडेवारी बंदी आदेशात काही अंशी फेर बदल केला असून यामध्ये दहा गुंठे बागायती तर वीस गुंठे जिरायती जमिनीची खरेदी विक्री करण्यास परवानगी दिली आहे मात्र महापालिका नगरपालिका नगरपरिषदेचे हद्द वगळून सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यासाठी हा आदेश लागू करण्यात आला आहे.
तुकडेबंदी कायद्यानुसार यापूर्वी शेतकऱ्यांना बागायतीसाठी एक एकर तर जिरायतीसाठी दोन एकर जमीन असणे आवश्यक होते त्याशिवाय खरेदी विक्री करण्यास शासनाने प्रतिबंध केला होता त्यामुळे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात लाखो शेतकरी या तुकडेबंदी कायद्याच्या जाचक अटीत सापडल्यामुळे त्यांच्या जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार प्रकटले होते यामध्ये राज्य शासनाच्या महसूल विभागाने आठ ऑगस्ट 2023 रोजी नव्याने अधिसूचना जारी केली आहे यामध्ये बागायत जमिनीसाठी कमीत कमी दहा गुंठे तर जिराईत जमिनीसाठी किमान 20 गुंठे जमिनीची खरेदी विक्री करण्यास परवानगी दिलेली आहे त्यामुळे कमी क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे शासनाच्या या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे यामुळे तुकडे बंदी कायद्यात अडकलेल्या शेतकऱ्यांची यातून सुटका होणार आहे तसेच खरेदी-विक्री झाल्यानंतर त्यांची सातबारा उताऱ्या वरती रीतसर नोंद केली जाणार आहे त्यामुळे सोलापूर शहर जिल्ह्यात सह संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.