श्रीपूर मध्ये शिव-धैर्य संस्थेकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
विद्यार्थ्यांना केले खाऊ आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप

विद्यार्थ्यांना केले खाऊ आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप
श्रीपूर तालुका माळशिरस येथील शिव-धैर्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहसीन पठाण व त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी श्रीपूर श्रीनगर कॉलनी मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली.सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीपूरच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड, पीएसआय स्वाती कांबळे मॅडम, महाळुंग- श्रीपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, बोरगावचे ज्येष्ठ नेते एडवोकेट प्रकाशराव पाटील, नगराध्यक्षपती पैलवान अशोक चव्हाण, नगरसेवक व गटनेते नानासाहेब मुंडफणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व गटनेते राहुल रेडे, नगरसेवक तानाजी भगत, नगरसेवक प्रकाश नवगिरे, नगरसेवक सोमनाथ मुंडफणे, पत्रकार बाबासाहेब शिवशरण, तुकाराम बाबर, मौला पठाण, राजेंद्र वाळेकर, विक्रम लाटे, दादा लाटे, प्रा.नरेंद्र भोसले, ए एस आय बाळासाहेब पानसरे, पोलीस कॉन्स्टेबल चंदनशिवे, धनाजी कुरडे, डॉ. गाडे, अमरसिंह पिसाळ-देशमुख, महेश रणपिसे, बबन कदम, पवळ सर, काटे, ठोकळे, बाळासाहेब कामते, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.