महाराष्ट्र

तुमच्या गावचा सरपंच कोण होणार? गावकारभाऱ्याचा नवा आराखडा तयार

माळशिरस तालुक्यातील सरपंच पदाच्या १०३ ग्रामपंचायतींच्या आरक्षणाची यादी जाहीर

थेट जनतेतून सरपंच निवडीसाठी आरक्षण जाहीर 

गावाच्या कारभाऱ्याचा (नेतृत्वाचा) नवा आराखडा तयार!

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू!

ग्रामपंचायत आरक्षण जाहीर!

माळशिरस तालुक्यातील १०३ गावांचे सरपंच आरक्षण निश्चित

माळशिरस | १५ जुलै २०२५ | [इन महाराष्ट्र न्यूज, संपादक दत्ता नाईकनवरे]

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठीच्या सरपंच पदांचे आरक्षण आज अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. हा सोडत कार्यक्रम नियंत्रण अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर प्रांत मॅडम, माळशिरस तहसिलदार सुरेश शेजुल  यांचे अध्यक्षते, निवासी नायब तहसीलदार अमोल कदम यांच्या उपस्थिती मध्ये पंचायत समितीच्या सभागृहात पार पडला. महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम १९६६ अंतर्गत सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यावेळी विविध गावातील नागरिक, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, पदाधिकारी, ग्रामस्थ व पत्रकार बांधव उपस्थित होते.

या प्रक्रियेत एकूण १०३ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून, त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग (OBC) आणि सर्वसाधारण प्रवर्ग या चार प्रमुख प्रवर्गांचा समावेश आहे.

🔹 आरक्षणाचा एकूण तपशील:

प्रवर्ग एकूण जागा पुरुष महिला
अनुसूचित जाती (SC) 24 12 12
अनुसूचित जमाती (ST) 1 1 0
इतरमागासवर्गीय (OBC) 28 14 14
सर्वसाधारण (General) 50 25 25
एकूण 103 52 51

🔸 अनुसूचित जाती (SC) साठी आरक्षित ग्रामपंचायती:

▪️ अनुसूचित जाती प्रवर्ग पुरुष प्रवर्ग (12 गावे):गाव ग्रामपंचायतची नावे
कदमवाडी, देशमुखवाडी, उंबरे दहिगाव, मेडद, मांडकी,  मळोली साळमुखवाडी, कोळेगाव, तामसीदवाडी, तांदुळवाडी, जाधववाडी, भांबुर्डे, बचेरी

▪️ अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी महिला प्रवर्ग (१२ गावे):गाव ग्रामपंचायतची नावे
मोटेवाडी मा, मांडवे, खुडूस, भांब, बिजवडी, संगम, कोंढारपट्टा, खळवे, पठाणवस्ती, फोंडशिरस-मोटेवाडी, संग्रामनगर, पिलीव .

🔸 अनुसूचित जमाती (ST) साठी:

▪️ अनुसूचित जमाती प्रवर्ग (१ गाव):गाव ग्रामपंचायत नाव
माळीनगर

🔸 ओबीसी (OBC) साठी आरक्षित ग्रामपंचायती:

नागरिकांचा मागास प्रवर्ग गावांची नावे: 

▪️ पुरुष प्रवर्ग (14 गावे):गाव ग्रामपंचायतची नावे
पाणीव घुलेनगर, डोंबाळवाडी कु, झिजेवस्ती पि., हनुमानवाडी, कुरबावी, कचरेवाडी, चाकोरे प्रतापनगर, चौंडेश्वरवाडी, सवतगव्हाण, फळवणी, सदाशिवनगर, कारुडे, तांबवे, एकशिव 

▪️ महिला प्रवर्ग (12 गावे):गाव ग्रामपंचायतची नावे
पिरळे, बागेचीवाडी, गणेशगाव, झंजेवाडी खु., पिसेवाडी, लोणंद, गोरडवाडी, सुळेवाडी, बोंडले, तोंडले, लवंग, निमगाव, कोथळे, डोंबाळवाडी खु.,

🔸 सर्वसाधारण (General) प्रवर्गातील आरक्षित ग्रामपंचायती:

▪️ सर्वसाधारण पुरुष प्रवर्ग (25 गावे):गाव ग्रामपंचायतची नावे
कळंबोली,  बांगरडे, फरतरी शिवारवस्ती नेटेवेवाडी, लोंढे मोहितेवाडी, पुरंदावडे,  येळीव, गिरवी, रेडे, बोरगाव, पिंपरी, तरंगफळ, गारवाड मगरवाडी, वाफेगाव, उंबरे वे., मारकरवाडी, माळखांबे, जांभूड, उघडेवाडी, दसुर, माळेवाडी बो., धानोरे, मिरे, धर्मपुरी, खंडाळी दत्तनगर, दहिगाव.

▪️ सर्वसाधारण महिला प्रवर्ग (25गावे):गाव ग्रामपंचायतची नावे
तांबेवाडी, मोरोची, कन्हेर, तिरवंडी, इस्लामपूर, जळभावी, कोंडबावी वटफळी, आनंदनगर, विझोरी, बाभुळगाव, नेवरे, विठ्ठलवाडी, शेंडेचिंच, चांदापूरी, कुसमोड, काळमवाडी, गुरसाळे, विजयवाडी, यशवंतनगर, गिरझणी, शिंदेवाडी, वेळापूर, शिंगोर्णी, वाघोली, पळसमंडळ.

आरक्षणाच्या या यादीमुळे सामाजिक समतेला चालना मिळणार असून, मागास व दुर्बल घटकांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रतिनिधित्वाची संधी उपलब्ध होईल. यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सर्वच घटकांमधील उत्सुकता वाढली आहे.

✍️ बातमी — इन महाराष्ट्र न्यूज |  संपादक – दत्ता नाईकनवरे

सविस्तर पीडीएफ ओपन करण्यासाठी येथे क्लिक करा..Arakstion_15.7.2025 Sarpancha malshiras 103 grap येथे क्लिक करा

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!