महाराष्ट्र

श्रीराम टॉकीज अकलूज | पश्चिम महाराष्ट्रामधील सर्वोत्कृष्ट सिनेमागृह | असे आहे सिनेमा थिएटर | ShriRam

पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पैसा छावा सिनेमाने या चित्र मंदिरामधून मिळविला 

दक्षिण भारतातील आणि पश्चिम  महाराष्ट्रामधील सर्वोत्कृष्ट सिनेमागृह 

अकलूज ता.माळशिरस येथील अत्याधुनिक पद्धतीने रिनोवेशन करून बनविलेले श्रीराम चित्रमंदिर (श्रीराम बॉक्स ऑफिस) थेटर  चे मालक प्रकाश(बापू) शामराव पाटील यांनी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला खास महिला दिनानिमित्त पत्रकारांना आणि पत्रकारांच्या कुटुंबीयांना छावा चित्रपट बाल्कनी मधून बघण्याचा आनंद घडवून आणला. यानिमित्त माळशिरस तालुक्यातील पत्रकार बांधवांनी कुटुंबात समवेत छावा सिनेमाचा आनंद घेतला. याबद्दल थिएटरचे मालक प्रकाशराव बापू पाटील यांचे आभार मानून शुभेच्छा दिल्या.

आधुनिक साऊंड सिस्टिम, संपूर्ण डिजिटलायझेशन स्वच्छ, सुंदर, आकर्षक, रोषणाई, आरामदायक सीट्स, बॅकसपोर्टसह, आरामदायक,  बसण्याची व्यवस्था, वातानुकूलित सिनेमागृह, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था,  महिलांच्या दृष्टिकोनातून  सुरक्षितता, अशा अनेक आधुनिक सुविधां देऊन श्रीराम थिएटर परत एकदा प्रेक्षकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये  छावा सिनेमाचे वितरण यांच्याच मार्फत केले गेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पैसा छावा सिनेमाने या चित्र मंदिरामधून मिळविला आहे.  महाराष्ट्रामध्ये सर्व आधुनिक तंत्रज्ञान वापरून थेटर चे नूतनीकरण केले आहे. छावा सिनेमा हा थेटर चे नूतनीकरण  केल्यानंतरचा पहिला शो आहे.   असे थेटर चे मालक प्रकाश बापू शामराव पाटील यांनी सांगितले.

थेटर मधील  विशेष सोयी सुविधा : 

  • आरामदायक सीट्स, बॅकसपोर्टसह
  • वातानुकूलित सिनेमागृह
  • स्वच्छता आणि देखभाल याकडे विशेष लक्ष

मल्टी-चॅनेल सराउंड साऊंड, ज्यामुळे चित्रपट पाहताना एक अद्वितीय ध्वनी अनुभव मिळतो

स्पष्ट संवाद आणि प्रभावी बास यामुळे अॅक्शन आणि संगीत दृश्यांचा प्रभाव वाढतो

डिजिटल प्रोजेक्शनसह उच्च रिझोल्यूशन स्क्रीन (HD/4K)

स्पष्ट आणि चमकदार व्हिज्युअल अनुभव

स्क्रीनचा आकार थिएटरच्या आकारानुसार समतोल ठेवलेला आहे

अकलूज येथील श्रीराम चित्रमंदिर  हे पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चित्रपटगृह आहे. येथे विविध मराठी, हिंदी आणि इंग्रजी चित्रपटांचे प्रदर्शन  गेले अनेक वर्षापासून केले जाते. चित्रपटगृहामध्ये आसन व्यवस्था, ध्वनी प्रणाली आणि पडदा म्हणजेच स्क्रीनची गुणवत्ता उत्तम आहे.

थिएटरचं नूतनीकरण झाल्यानंतरचा पहिला शो नेहमीच खास असतो. नव्या जागेचा उत्साह, स्वच्छता, तंत्रज्ञान सुधारणा आणि आरामदायी आसनं यामुळे प्रेक्षकांना नवीन अनुभव मिळतो.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!