महाराष्ट्र

माळीनगर (गट नं.२) येथील प्राथमिक शाळेत महिलादिन मोठ्या उत्साह साजरा.

समाजात वेगवेगळ्या क्षेत्रांत भरीव योगदान देणाऱ्या महिलांचे केले सन्मान 

समाजात वेगवेगळ्या क्षेत्रांत भरीव योगदान देणाऱ्या महिलांचे केले सन्मान 

माळीनगर  (प्रतिनिधी) महिलांचे सशक्तीकरण, सृजनशीलता आणि आनंदाचा उत्सव याचा त्रिवेरी दर्शन घडवत  दि.सासवड माळी एज्युकेशन सोसायटी संचालित माळीनगर (गट नं.२) येथील प्राथमिक शाळा क्र.३ येथे नुकताच जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या महिलादिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.अर्चना पांढरे,संस्थेच्या खजिनदार ज्योतीताई लांडगे यांच्यासह अनेक प्रतिष्ठित महिलांचा सत्कार या सोहळ्यात करण्यात आला.

समाजात वेगवेगळ्या क्षेत्रांत भरीव योगदान देणाऱ्या महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला.यामध्ये डॉ. विनया हाके,फिनिक्स इंग्लिश मिडियम स्कूलच्या संस्थापक अध्यक्षा नूरजहाँ शेख,आदर्श शिक्षिका व खेळाडू रूपाली आसबे-भोसले तसेच सौ.शितल बोरावके यांचा समावेश होता.या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.अर्चना पांढरे यांनी महिलांनी स्वतःला कणखर बनवले पाहिजे‌.असे प्रतिपादन केले तर कवीयत्री नूरजहाँ शेख यांनी आपल्या कवितेतून समस्त स्त्री वर्गासाठी प्रेरणादायी विचार मांडले.डॉ. विनया हाके मॅडम यांनी महिलांच्या आरोग्यासाठी स्वसंरक्षण आणि जीवनशैली यावर मार्गदर्शन केले.सौ.शितल बोरावके यांनी महिलांचे आर्थिक सशक्तीकरण याविषयी प्रेरणादायी विचार मांडले.सौ रूपाली आसबे-भोसले यांनी महिलांनी आपले छंद जोपासून त्यातून प्रगती साधावी असा संदेश दिला.याप्रसंगी श्वेता बोरावके,अनिता बोरावके,सुज्ञा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते

ईश्वरी अनपट या विद्यार्थिनीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर पोवाडा सादर केला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.ललिता नागटिळक मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती वंदना बंडगर मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.स्मिता म्हेत्रे मॅडम यांनी केले.

यावेळी महिला दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पाककला स्पर्धा,लिंबू- चमचा स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धांचे घेण्यात आल्या होत्या. त्यातील विजेत्या महिलांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.यामध्ये सहभागी महिलांच्या उत्साहाने संपूर्ण परिसर आनंदमय झाला.या सोहळ्याने महिलांच्या कल्पकतेला आणि आत्मविश्‍वासाला बळ दिले. संघर्षातून स्त्री शक्तीकडे…या भावनेने प्रेरित होत,अतिशय उत्साहात महिलादिन पार पडला.हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रविण खरात,वैजिनाथ भोसले, गोविंद काळे,सौ.गौरी शिंदे मॅडम यांनी परिश्रम घेतले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!