सिद्धयोगी इन्स्टिट्यूटमध्ये लॅम्प लाइटिंग व शपथविधी सोहळा उत्साहात
९४ टक्क्यांहून अधिक निकालाची परंपरा; सिद्धयोगी इन्स्टिट्यूटचा गौरव

सेवेचा वसा, समर्पणाची शपथ : सिद्धयोगी नर्सिंग कॉलेजचा भव्य सोहळा
अकलूज (केदार लोहकरे) :
अकलूज येथील सिद्धयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेजमध्ये लॅम्प लाइटिंग व ओथ टेकिंग सेरेमनी (शपथविधी) कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. नर्सिंग क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा क्षण अत्यंत प्रेरणादायी व गौरवाचा ठरला.
या कार्यक्रमासाठी डॉ. महेशकुमार सुडके (मेडिकल सुपरिटेंडंट, पंढरपूर) तसेच डॉ. सौ. श्वेता महेश सुडके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. तानाजीराव कदम होते.
यावेळी जी.एन.एम. फर्स्ट इयरचा निकाल ९४.८७ टक्के तर जी.एन.एम. सेकंड इयरचा निकाल ९४.५९ टक्के लागल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. प्रज्योत माने सर यांनी विद्यार्थ्यांना नर्सिंग सेवेची शपथ दिली.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
फर्स्ट इयर जी.एन.एम. – सायली निलेश वाघमारे (८०.८०%), वैष्णवी कृष्णा हरदाडे (७८%), मयुरी धर्मेंद्र सावंत (७७%), आनंद उत्तम मुंडे (७६%), दत्तात्रय लवटे (७५%).
सेकंड इयर जी.एन.एम. – ज्योती महेश ठोकळे (७६.७१%), माया दादासाहेब भोसले (७५.७१%), सोनम शहाजी भोसले (७५.४२%), पूजा काशीराम बनसोड (७४.७१%), लक्ष्मी देवी दिनेश कुमार गुप्ता (७४.५७%). या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. याचबरोबर विद्यार्थ्यांच्या पालकांचाही अध्यक्ष व पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
डॉ. महेश सुडके यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. सिद्धयोगी इन्स्टिट्यूटचे भवितव्य उज्ज्वल असून परिसरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
संस्थेच्या सचिव डॉ. अंजली कदम यांनी गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्व विकासावर भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. सिद्धराज कदम यांनीही विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे प्राचार्य कौस्तुभ सुळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश देशमुख व अविंदा मगर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रकाश देशमुख यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व त्यांच्या पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



