श्रीपूर मध्ये जुगार अड्ड्यावर अकलूज पोलिसांची धडक कारवाई – १२ जण ताब्यात
१,४२,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

जुगार खेळणारे रंगेहाथ पकडले; १.४२ लाखांचा मुद्देमाल जप्त, रोख रक्कम, मोबाईल व मोटारसायकल जप्त
श्रीपूर (ता. माळशिरस) येथील जगदीशनगर भागात अकलूज पोलिसांनी मोठी कारवाई करत १२ जुगाऱ्यांना रंगेहाथ पकडले. यावेळी एकूण १,४२,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे अन्वेषण पथकातील पो.स.ई. विशाल कदम, पो.हे.कॉ. जाधव, साठे व पो.कॉ. जगताप यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे जगदीशनगर येथील बाळू साठे यांच्या घरासमोरील अंगणात छापा टाकला. तेव्हा श्रीपूर येथील 5 जुगार खेळणारे इसम, मिरे सेक्शन 14 येथील 1, जांभूड सेक्शन 14 येथील 2, बोरगाव येथील 3, पंढरपूर पिराची कुरवली येथील 1 असे एकूण 12 जुगार खेळणाऱ्यांवरती जुगार अॅक्ट कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. हे सर्व जण तिरट नावाचा जुगार खेळताना मिळून आले.
या कारवाईत ७,०५० रुपये रोख, ९०,००० रुपयांची टीव्हीएस रायडर मोटारसायकल, तसेच ४५,००० रुपयांचे ७ मोबाईल हँडसेट असा एकूण १,४२,०५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमूद आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. परिसरात अशा प्रकारचे अनेक जुगारा अड्डे सुरू आहेत. त्यांच्यावर देखील अशा प्रकारच्या कारवाया तात्काळ करून कायमस्वरूपी जुगार बंद करण्यात यावे. अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे, तसेच समाजात गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी अशी धडक कारवाई सातत्याने व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.