महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी रतनसिंह रजपूत यांची निवड
रतनसिंह (आप्पा) राजपूत झाले स्वीकृत नगरसेवक, महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत

रतनसिंह (आप्पा) राजपूत झाले स्वीकृत नगरसेवक, महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत
श्रीपूर तालुका माळशिरस येथील महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या सत्ताधारी गटातील स्वीकृत नगरसेवकाची निवड आज नगरपंचायतीच्या ऑफिसमध्ये पार पडली. मोहिते पाटलांचे कट्टर समर्थक रतनसिंह नामदेव रजपूत यांची स्वीकृत नगरसेवक पदी नेमणूक करण्यात आली. रतनसिंह रजपूत यांचे बंधू कै,अनिलसिंह राजपूत यांनी खऱ्या अर्थाने सामुदायिक विवाह सोहळे व मोहिते पाटलांचे असणारे एकनिष्ठ संबंध यांच्या मधून सामाजिक, राजकीय कारकीर्द सुरू केली. कै.अनिलसिंह राजपूत यांच्या नंतर त्यांचे बंधू रतनसिंह (आप्पा) राजपूत यांनी आपल्या बंधूंचा वारसा पुढे चालू ठेवा. आणि परिसरात अनेक सामुदायिक विवाह सोहळे, रक्तदान शिबिरे, सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन सर्वांबरोबर स्नेहाचे संबंध ठेवले. व मोहिते पाटलांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची पूर्व भागामध्ये ओळख निर्माण केली. विजय-प्रताप युवा मंचचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. या सर्व कामाची दखल घेऊन मोहिते पाटील कुटुंबियाकडून त्यांची महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्याची शिफारस करण्यात आली.
रतनसिंह रजपूत यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड होताच, त्यांचे श्रीपूरमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. हलग्यांच्या आवाजात, गुलाल उधळून त्यांचे अनेक ठिकाणी सत्कार देखील करण्यात आले. सोशल मीडियावरती देखील त्यांना अनेक शुभेच्छा येताना दिसत आहेत.