श्रीपूरच्या युवकाचा रंगकाम करून शिडीमधून उतरताना पडून जागीच मृत्यू
शुक्रवारी दुपारी बारा वाजता घडली घटना | बराच वेळ शिडी मध्ये मृतदेह अडकून पडला होता

शुक्रवारी दुपारी बारा वाजता घडली घटना | बराच वेळ शिडी मध्ये मृतदेह अडकून पडला होता
श्रीपूर तालुका माळशिरस यमाईनगर येथील कायम रहिवाशी असणारे संजय मारुती पांडगळे या 52 वर्षीय तरुणाचा कर्नाटक राज्यामधील जिल्हा बेळगाव तालुका रायबाग, अंकली गावांमध्ये असलेल्या शिव शक्ती साखर कारखाना बॉयलर चिमणीचे रंगकाम करून, जेवणासाठी खाली शिडीमधून उतरताना पाय घसरून पडल्यामुळे जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. बराच वेळ शिडीमध्ये मृतदेह अडकला होता. घटनास्थळी पोलिसांनी येऊन पंचनामा करून पुढील तपास व चौकशी सुरू केली आहे.
संजय पांडगळे हे गरीब प्रामाणिक कष्टाळू असे व्यक्तिमत्व होते. अतिशय हलाक्याच्या परिस्थितीतून त्यांनी कष्ट करून आपला संसार उभा केला होता. गेले अनेक वर्षांपासून ते राज्यात पर राज्यात अनेक ठिकाणी रंगकाम करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांबरोबर जात होते. अशातच काल अपघाताची ही दुर्दैवी घटना घडली आहे. संजय पांडगळे हे आधी श्रीपूर मधील नऊच्या गोठ्यावरती राहत होते. त्यामुळे त्यांचा श्रीपूर महाळुंग परिसरामध्ये मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे सर्वांशी सलोख्याचे संबंध होते. ही अपघाताची दुर्घटना झाल्याचे समजतात परिसरावरती शोककळा पसरली. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास त्यांच्या वरती शहीद निवृत्ती नगर स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी सकाळी सात वाजता माती सावडण्याचा कार्यक्रम आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगा, एक मुलगी, आई असा परिवार आहे.
.