श्रीपूर मध्ये प्रिन्स मेन्स वेअरला पहाटे लागली आग | आगीमध्ये मोठे नुकसान
लाखो रुपयांचे नुकसान | कपडे, मशीन, साहित्य, जळून खाक

श्रीपूर तालुका माळशिरस येथील नामवंत असणारे प्रिन्स मेन्स वेअर या कपडे शिलाईच्या दुकानाला शुक्रवारी पहाटे साडेचार वाजल्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. बापू भाऊ सुरवसे यांचे हे दुकान गेले अनेक वर्षापासून परिसरामध्ये कपडे शिलाई साठी प्रसिद्ध आहे. सध्या लग्नसराई आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कपडे शिलाई साठी खूप मोठ्या प्रमाणात आलेली होती. अत्याधुनिक शिलाई यंत्रे त्यांच्याकडे होती.
पहाटे अचानक लागलेल्या आगीमुळे पाच अत्याधुनिक शिलाई मशीन, काज मशीन, जिगजाग मशीन, बटन मशीन आणि दोन शिलाई मशीन व इतर शिलाईचे साहित्य जळून खाक झाले आहे. जळलेल्या कपड्याचे ढीग दुकानाच्या आत मध्ये दिसून येत होते.काचेचे शोकेस, फर्निचर टेबल, कपाट, फॅन, साऊंड सिस्टम, इस्त्रीटेबल, असे जुने नवीन कपडे, इस्त्री करण्यासाठी आलेले कपडे जळाल्यामुळे अंदाजे सहा ते सात लाख रुपयेचे वर आगीत जळाल्यामुळे नुकसान झाले आहे.
सकाळी ही बातमी कळताच त्यांच्या सर्वमित्र परिवारानी आणि महाळुंग गाव कामगार तलाठी जगदाळे भाऊसाहेबांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे. त्यामध्ये अंदाजे सहा ते सात लाखाचे आसपास नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटने आग लागल्याचे बोलले जात आहे.
Advertise