रस्त्या लगतच खड्डे पाडून साईड पट्टी भरली, ठेकेदाराची करामत
श्रीपूर-चौकी-अकलूज-(भाटघर कॅनॉल लगत) रोडवर अपघाताचा धोका वाढला.

श्रीपूर तालुका माळशिरस येथील अकलूज-श्रीपूर भाटघर कॅनॉल रोड लगत चार वर्षापूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून डांबरीकरण केलेला रोड आहे. काल दुपार पासून मेन्टेनन्सच्या नावाखाली त्या ठिकाणी साईड पट्टी भरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या आधिपत्याखाली संबंधित ठेकेदाराने सुरू केले आहे. रस्त्यालगदच दोन्ही बाजूला जेसीपी ने खड्डे खोदून तिथेच साईट पट्टी वरती माती भरण्याचे काम सुरू केले आहे. या कॉन्टॅक्टदराचा अजब कारभार काल दिवसभरा मधून रस्त्यावरून जाणारे येणारे प्रवासी आणि स्थानिक नागरिक पाहत होते.
श्रीपूर ते चौकी रोडची साईट पट्टी भरण्यासाठी एक जेसीपी लावून, रस्त्यालगतच चार चार फुटावरती खड्डे घेऊन तिथलीच माती दोन्ही बाजूच्या साईट पट्ट्यांमध्ये भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. वास्तविक पाहता साईट पट्टी वरती मुरूम भरून सदर रोलिंग करणे आवश्यक आहे. परंतु संबंधित काही भ्रष्ट शासकीय बांधकाम अधिकारी, त्यांना खतपाणी पुरवणारे संबंधित ठेकेदार यांच्यामुळे अशा प्रकारची निकृष्ट कामे करून वर्षानुवर्ष बिल काढण्याचे काम संबंधित रोडचे झाल्याचे दिसून येत आहे.
गेले पाच वर्षापासून संबंधित रोडची देखभाल दुरुस्तीची व्यवस्था, संबंधित कंट्रक्शन कडे आहे. परंतु त्यांनी कोणतेही निविदे प्रमाणे व्यवस्थित काम केल्याचे दिसून येत नाही.
रस्त्याच्या बाजूला खड्डे घेतल्यामुळे या ठिकाणी भविष्यात मोठे अपघात होणार आहेत. याच रस्त्यावरून अनेक वारकरी, त्यांची वाहने,पालखी मुक्कामाच्या वेळी येणार आहेत. रोज हजारोच्या संख्येने अकलूज ला जाणार येणारे स्थानिक व पूर्व भागातील अनेक प्रवासी जात येत आहेत. या रोडच्या लगतच अनेक वारकऱ्यांच्या राहुट्या बोरगाव मुक्कामी पालखी असताना श्रीपूर परिसरामध्ये केल्या जातात. अनेक वहाने येत असतात. पाऊस पडल्यानंतर सध्या साईड पट्ट्यात भरलेल्या मातीचा चिखल होऊन आणि त्या दोन्ही बाजूला लगतच केलेल्या खड्ड्यांमुळे यामध्ये लवकरच नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागणार आहे. या गोष्टीसाठी संबंधित बांधकाम विभाग आणि रस्ता दुरुस्त करणारा ठेकेदार जबाबदार राहणार आहेत असे स्थानिक नागरीकांनी सांगितले आहे. एकंदरीत भविष्यामध्ये श्रीपूर-चौकी-अकलूज-(भाटघर कॅनॉल लगत) रोडवर अपघाताचा धोका वाढणार आहे
लवकरच याबाबत बांधकाम विभागापुढे आंदोलन केले जाणार आहे. सदर रोड ची निवेद्येप्रमाणे साईड पट्टी भरून व्यवस्थित रोलर लावून साईड पट्टी दाबून घेणे आवश्यक आहे. आणि जेसीपी ने साईड पट्टी भरणे साठी पाडलेले व रस्त्यामध्ये पडलेले खड्डे तात्काळ बुजवून रस्ता मजबूत करणे आवश्यक आहे.
अकलूज पासून श्रीपूर पर्यंत रस्ता अनेक ठिकाणी उखाडलेला आहे. काही अनावश्यक ठिकाणी गतिरोधक केलेले आहेत. आवश्यक तिथे करण्यात आलेले नाहीत. अनेक ठिकाणी खड्डे पडून रस्त्याची वाट लागलेली आहे. संबंधित ठेकेदाराने सर्व रस्ता ठरलेल्या निवेदाप्रमाणे व शासनाच्या नियमाप्रमाणे,रोड लगत लावलेल्या बोर्ड वरील नियमास अधीन राहून करणे आवश्यक होते. प्रत्येक वर्षी आवश्यकते नुसार संबंधित ठिकाणी खर्च करून प्रवाशांची गैरसोय होणार नाही अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे. परंतु झोपलेला बांधकाम विभाग, डोळ्यावर पट्टी बांधून इन्स्पेक्शन करणारे संबंधित अधिकारी, यामुळे अशा प्रकारचे निकृष्ट कामे संबंधित ठेकेदार करून आपले व अधिकार्यांचे खिसे भरण्याचे काम गेले चार वर्षापासून करत असल्याचे चित्र या रोडच्या एकंदरीत सद्यस्थितीवरून पहावयास मिळत आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या रस्त्याचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून परत कोणतेही काम देऊ नये अशी मागणी करण्यात येणार आहे.