आरोग्य व शिक्षण

माळशिरस तालुक्यात कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन मार्फत कॅन्सर तपासणी शिबिर संपन्न.

सोलापूर जिल्हात प्रथमच या शिबिराचे आयोजन मोरोची येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले

मोरोची येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन मार्फत कॅन्सर तपासणी शिबिर संपन्न.

अकलूज प्रतिनिधी (केदार लोहकरे )
महाराष्ट्र शासनाच्या असंसर्गिक रोग कार्यक्रमांतर्गत कॅन्सर डायक्नोस्टिक व्हॅन मार्फत कॅन्सर तपासणी शिबिर मोरोची (ता.माळशिरस) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आयोजित करण्यात आले होते.त्यासाठी सर्व सोयीने युक्त अशी व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यामध्ये स्त्रियांमध्ये असलेल्या स्तनाचा कर्करोग व योनी मार्गाचा कर्करोग तसेच मौखिक कर्करोग तपासणी जिल्हास्तरावरून आलेल्या तज्ञामार्फत निदान करून रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले तसेच ज्या लोकांना पुढील तपासणी व औषध उपचाराची गरज असलेल्या लोकांना मार्गदर्शन करण्यात आले.
या शिबीरासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.किशोर घाडगे, सहाय्यक संचालक कुष्ठरोग सोलापूर डॉ.प्रियांका शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी माळशिरस,सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एम.पी.मोरे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय नातेपुते डॉ.संतोष खडतरे जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ.रोहन वायचळ जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीमती वैशाली थोरात,आय.पी‌.एच.एस. समन्वयक श्रीमती शोभा माने स्वप्नपरी जिल्हा सल्लागार डॉ.दळवी एनसीडी जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ.सातपुते पी.एस.सी.समन्वयक डॉ.गार्दी यांचे उपस्थितीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवानी लाड उपस्थित होते हे शिबिर डॉ.परतवार मॅडम,डॉ.लाड मॅडम व प्राथमिक आरोग्य केंद्र मोरूची येथील सर्व कर्मचारी व आशा वर्कर्स यांच्या चांगल्या नियोजनाखाली पार पडले.

सोलापूर जिल्हात प्रथमच या शिबिराचे आयोजन मोरोची येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले होते.या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या अकरा गावांमधील १२१ लाभार्थ्यांना याचा लाभ झाला आहे आणि या शिबिराबद्दल लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!