लवंग येथे कृषिकन्यांनी माती परीक्षणाची माहिती पटवून दिली
शेतकऱ्यांना माती परीक्षणाबाबत माहिती देताना कृषिकन्या

अलीकडील काळात जमिनीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आढळून येत आहे; म्हणून जमिनीच्या आरोग्यविषयक माहिती असने आवश्यक आहे शेतकऱ्यांना याविषयी जाणीव होणे गरजेचेआहे , यालाच अनुसरून रत्नाई कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या उत्कर्षा फुले , अस्मिता शिंदे, दिशा मगर , कल्याणी मोरे , साक्षी सरगर , संजना पाटील, शुभांगी खोमणे , सुप्रिया भिताडे, वैष्णवी सानप यांनी शेतकन्यांना माती परीक्षण माहिती दिली
माती परीक्षणाचा मूळ उद्देश जमिनीत पीक वाढीसाठी कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे तपासणी करुन, कमतरता भरून काढण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, हे यासाठी कृषकन्यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षणाविषयी मार्गदर्शन केले . अध्यक्ष यावेळी अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील , रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर . जी . नलावडे , कार्यक्रम समन्वयक प्रा . एस . एम एकतपुरे , प्रोग्राम ऑफिसर प्रा . एम . एम . चंदनकर आणि प्रा . एच . व्ही . कल्याणी यांच्या मार्गदर्शनानुसार कृषिकन्यांनी लवंग मधील शेतकर्यांना माहिती दिली व यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शेतकऱ्यांना मातीचा नमुना कसा घ्यावा, कोणत्या ठीकाणाचा घ्यावा. कोणत्या ठिकाणी पेरू नये मातीची उत्पादकता सुधारण्यासाठी करायचे उपाय आवश्यक अन्नपदक व त्याच्या कमतरतेमुळे पिकावर दिसणारी लक्षणे याविषयी प्रात्यक्षिक घेऊन मार्गदर्शन केले.