क्राईम

अपघातामध्ये एका लहान मुलाचा मृत्यू | स्विफ्ट कारच्या पुढच्या भागाचा झाला चुराडा | आयशरची झाली पलटी

बोरगाव वेळापूर रोड वरती भीषण अपघात एक लहान मुलगा गंभीर जखमी

अपघातामध्ये लहान मुलाचा मृत्यू

स्विफ्ट कारच्या पुढच्या भागाचा झाला चुराडा, आयशरची झाली पलटी

श्रीपूर प्रतिनिधी

बोरगाव तालुका माळशिरस येथे NH-965-G संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग बोरगाव-वेळापूर सर्व्हिस रोड वरील पुलाखाली सकाळी दहाच्या सुमारास MH 45 A 3254 स्विफ्ट गाडी आणि MH 13 R 2085 डीजे वाद्याचा आयशर कंपनीच्या कॅण्टरची धडक होऊन स्विफ्ट मधील पाच प्रवासी जखमी झाले आहेत. एका लहान मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे तर एक लहान मुलगा गंभीर जखमी आहे. दोन्ही वाहने एकाच लग्नाला नेवरे या ठिकाणी चालली होती.

सकाळी कुर्डूवाडी वरून समाधान अभिमान व्यवहारे आपल्या कुटुंबासोबत नेवरे येथील आपल्या गावी लग्नासाठी निघाले होते. संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील सर्व्हिस रोडने बोरगावच्या दिशेने वळताना वेळापूर वरून बोरगावला येणारा डीजे वाद्याच्या आयशर कॅण्टरची आणि स्विफ्ट गाडीची धडक होऊन स्विफ्ट गाडी समोरून चक्काचूर झाली आणि आयशर कॅण्टरची एका बाजूला पलटी झाल्याची घटना घडली आहे.

यामध्ये छोटा मुलगा उत्कर्ष समाधान व्यवहारे वय 9 वर्षे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. समाधान व्यवहारे यांचा हात फॅक्चर झालेला आहे. त्यांच्या सौभाग्यवती चांदणी उर्फ उज्वला यांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे. दुसरा लहान मुलगा संकल्प गंभीर जखमी आहे. तर गाडीमध्ये असणारा सरांचा भाचा गणेश सावंत याचा देखील हात फॅक्चर झाला आहे. स्विफ्ट गाडीमध्ये एकूण पाच प्रवासी होते. जखमींवरती अकलूज मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळी गाडीमधून निघताना लग्न समारंभात पाहुण्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी, वधू-वरांना शुभेच्छा देण्यासाठी हे व्यवहारे कुटुंब निघाले होते. परंतु या अपघातामुळे व्यवहारे कुटुंबावरती शोक काळा पसरली आहे.

अकलूज पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे आणि दोन्ही वाहने टोइंगच्या साह्याने उचलून रस्ता रिकामा करून दिला आहे. दुपारपर्यंत स्थानिक व रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांची अपघात पाण्यासाठी दुतर्फा मोठी गर्दी झाली होती.

लग्न समारंभामध्ये जाऊन भेटीगाठी घेण्याची स्वप्न रंगवत असताना अचानक नेवरे गावी असणारे लग्न स्थळ अगदी जवळ आल्यानंतर हा व्यवहारे कुटुंबाचा अपघात घडला आहे. त्यामुळे लग्न कार्यात देखील या अपघातामुळे दुःखद वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे हा डीजेचा आयशर आणि स्विफ्ट कार मधील प्रवासी एकाच लग्नाला निघाले होते.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!