प्रस्ताव सादर करा, लाभ घ्या–बांधकाम कामगारांना वैष्णवीदेवी व अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांचे आवाहन
कोरोना काळात अनुदान, आता वस्तू संच – कामगारांसाठी मोहिते-पाटील परिवाराची मदत

माळशिरस तालुक्यातील बांधकाम कामगारांना गृहउपयोगी वस्तूंचे वाटप सुरू
प्रतिनिधी । अकलूज | इन महाराष्ट्र न्यूज पोर्टल
शिवरत्न वेल्फेअर ट्रस्ट व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे.
शनिवारी अकलूज येथे माजी उपमुख्यमंत्री श्री. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते कामगारांना प्रातिनिधिक स्वरूपात गृहउपयोगी वस्तू संचाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला अकलूज बाजार समितीचे सभापती श्री. मदनसिंह मोहिते-पाटील, आमदार श्री. रणजितसिंह मोहिते-पाटील, खासदार श्री. धैर्यशील मोहिते-पाटील, शिवरत्न वेल्फेअर ट्रस्टच्या उपाध्यक्षा सौ. वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, तालुका सुविधा अधिकारी सौ. मनीषा पवार तसेच सेवाभावी युवक, कामगार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार श्री. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले की,
- आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात बांधकाम कामगारांच्या योजनांचा प्रसार सर्वप्रथम केला.
- माळशिरस पंचायत समितीत विशेष नोंदणी कक्ष सुरू करून आतापर्यंत ३,८०० कामगारांची नोंदणी करण्यात आली.
- या उपक्रमासाठी सौ. वैष्णवीदेवी व श्री. अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
कोरोना काळात या कामगारांच्या उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शासनाकडून पाच हजार रुपयांचे अनुदान मिळवून देण्यात आले होते. याचाच पुढचा टप्पा म्हणून आता कामगारांना गृहउपयोगी वस्तू संचाचे वितरण सुरू करण्यात आले आहे.
यावेळी सौ. वैष्णवीदेवी व श्री. अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी आवाहन केले की, अजून ज्यांना या संचाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपले प्रस्ताव तयार करून सादर करावेत.