श्रीपूर उजनी वसाहतीमध्ये केले खेळण्यासाठी मैदान | Mahalung-Shreepur | Ground
मुंलानी खेळण्यासाठी व वयोवृद्धांनी फिरण्यासाठी यावे

वयोवृद्धांचा फिरण्याचा व मुलांच्या खेळण्याचा प्रश्न तात्पुरता मिटला.
श्रीपूर तालुका माळशिरस येथे उजनी वसाहतीमध्ये उजनी विभागाची मोठी खुली जागा व पडझड झालेल्या दगडी बांधकामाच्या खोल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणची दुरावस्था झालेली होती. काटेरी झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली होती.
प्रभाग १२ च्या नगरसेविका तेजश्री विक्रमसिंह लाटे, प्रभाग 11 चे नगरसेवक प्रकाश नवगिरे सर, व त्यांच्या मित्र मंडळांनी एकत्रित येऊन उजनी वसाहती मध्ये असलेल्या मोठ्या मैदानाची जेसीपी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने स्वखर्चाने डागडुजी करून मैदान तयार केले आहे. त्या ठिकाणी लहान मुलांची अनेक खेळणी लावून त्याचे रंगकाम देखील केले आहे.
महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या मुख्य अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सायंकाळी मर्क्युरी लाईट व बल्ब बसवून व नगरपंचायत स्वच्छता विभागास सांगून स्वच्छता ही करून दिली. त्याबद्दल सर्वांनी त्यांचे आभार मानले आहेत.
“गेल्या अनेक वर्षापासून श्रीपूर आणि परीसरात लहान मुलांना खेळण्यासाठी, व वयोवृद्धांना फिरण्यासाठी क्रींडागणच राहीले नव्हते, म्हणून आमच्या मित्रमंडळी नी स्वखर्चाने उजनी वसाहत येथे JCB मशीन व पुढील फळीच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने क्रींडागण व लहान मुलांची खेळणी रंगकाम करून चालू केले. पणं संध्याकाळ झाले नंतर अंधार असतो यांची कल्पना आम्ही CO साहेबांना दिली असता, तात्काळ साहेबांनी याची दखल घेत मर्क्युरी लाईट व बल्ब बसवून व नगरपंचायत स्वच्छता विभागास सांगून स्वच्छता ही करून दिली. तरी अधिकाधिक मुंलानी खेळण्यासाठी व वयोवृद्धांनी फिरण्यासाठी यावे.”- विक्रमसिंह लाटे, ग्रामस्थ