महाळुग-श्रीपूर नगरपंचायतीचे एकूण 17 प्रभागासाठीचे निकाल 2021-22 all ward voting
राष्ट्रवादीचे 6 उमेदवार विजयी, अपक्ष स्थानिक मोहिते-पाटील गटांच्या दोन आघाड्यांची मिळून सत्ता स्थापन होणार ?-महाळुग-श्रीपूर नगरपंचायत
महाळुग-श्रीपूर नगरपंचायतीचे एकूण 17 प्रभागासाठीचे निकाल घोषीत झाले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला सहा, भाजप एक, काँग्रेस एक, अपक्ष-स्थानिक मोहिते-पाटील यांच्या गटाच्या दोन आघाड्यांमध्ये, भीमराव रेडे यांच्या आघाडीचे पाच, तर नानासाहेब मुंडफणे यांच्या आघाडीचे चार उमेदवार निवडून आले आहेत. सतरा प्रभागांपैकी प्रभागा 16 मधून नाजिया पठाण या महिला ओबीसी प्रवर्गातील असून खुल्या जागेतून निवडून आल्या आहेत. तर सर्वाधिक मताधिक्य 408 घेऊन प्रभाग सात मधील तानाजी भगत हे निवडून आले आहेत.
17 प्रभागांमधील निवडून आलेले उमेदवार पुढील प्रमाणे, प्रभाग क्रमांक एक मध्ये काटे कल्पना विक्रांत काँग्रेस 223 मते विजयी, प्रभाग क्रमांक दोन मध्ये राहुल कुंडलिक रेडे पाटील राष्ट्रवादी काँग्रेस 236 मते विजयी, प्रभाग क्रमांक 3 मध्ये रेडे सविता शिवाजी राष्ट्रवादी काँग्रेस 311 मते विजय, प्रभाग क्रमांक चार मध्ये लोखंडे उज्वला जालिंदर स्थानिक आघाडी भीमराव रेडे पाटील पॅनल 310 मते विजयी, प्रभाग क्रमांक पाच मध्ये चव्हाण लक्ष्मी अशोक स्थानिक आघाडी भीमराव रेडे पाटील पॅनल 316 मते विजय, प्रभाग क्रमांक सहा मध्ये सावंत पाटील जोशना रावसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस 389 मते विजय, प्रभाग क्रमांक सात मध्ये भगत तानाजी नवनाथ स्थानिक आघाडी नानासाहेब मुंडफणे पॅनल 408 मध्ये विजयी, प्रभाग क्रमांक 8 मध्ये मुंडफणे सोमनाथ रघुनाथ स्थानिक आघाडी नानासाहेब मुंडफणे पॅनल 261 मते विजयी, प्रभाग क्रमांक 9 मध्ये मुंडफणे नानासाहेब सुदाम स्थानिक आघाडी प्रमुख 370 मते विजयी, प्रभाग क्रमांक दहा मध्ये लाटे स्वाती संजय स्थानिक आघाडी भीमराव रेडे पाटील पॅनल 232 मते विजयी, प्रभाग क्रमांक 11 मध्ये नवगिरे प्रकाश वामन भाजप 169 मते विजयी, प्रभाग क्रमांक 12 मध्ये लाटे तेजश्री विक्रमसिंह राष्ट्रवादी काँग्रेस 126 मध्ये विजयी, प्रभाग क्रमांक 13 मध्ये रेडे पाटील भीमराव हनुमंत स्थानिक आघाडी प्रमुख 220 मते विजयी, प्रभाग क्रमांक 14 मध्ये पाटील शारदा नामदेव राष्ट्रवादी काँग्रेस 147 मते विजयी, प्रभाग क्रमांक 15 मध्ये पटवर्धन निनाद प्रभाकर स्थानिक आघाडी भीमराव रेडे पाटील पॅनल 184 मते विजयी, प्रभाग क्रमांक 16 मध्ये पठाण नाजिया मोहसिन स्थानिक आघाडी नानासाहेब मुंडफणे पॅनल 129 मते विजयी, प्रभाग क्रमांक 17 मध्ये इंगळे नामदेव हरिबा राष्ट्रवादी काँग्रेस 111 मते विजयी, तर 17 प्रभागांमध्ये नोटाला 93 मतदारांनी पसंती दिली आहे.
एकंदरीत वरील निकाल पाहता कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. परंतु स्थानिक मोहिते-पाटील गटांच्या दोन आघाड्यांचे 5 आणि 4 असे एकूण 9 उमेदवार एकत्रित करून नव्याने निर्माण झालेल्या महाळुंग श्रीपूर नगरपंचायतीवर सत्ता स्थापन होऊ शकते. परंतु राजकारणा मध्ये काहीही होऊ शकते. त्यामुळे सर्वसत्ताधारी यांचे आजपासूनच सत्तास्थापनेचे नियोजन सुरू झाले आहे.

%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87-6-%e0%a4%89%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5
नाजिया पठाण या महिला ओबीसी प्रवर्गातील खुल्या जागेतून निवडून आल्या, तर सर्वाधिक मताधिक्य 408 घेऊन प्रभाग सात मधील तानाजी भगत हे निवडून आले..
a:2:{s:7:”sharing”;i:0;s:16:”vertical_sharing”;i:0;}