महाराष्ट्र

यशवंतनगर सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

माळशिरस वन विभागाचे विजय काळे व दिघे सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित

संग्रामनगर (केदार लोहकरे)
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम),सोलापूर अंतर्गत नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण प्रकल्प अंतर्गत,कार्यरत सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्र, यशवंतनगर (CMRC) यांच्या वतीने यशवंतनगर-अर्जुननगर येथे विविध पर्यावरणपूरक कार्यक्रमाचे आयोजन करून जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी माळशिरस वन विभागाचे विजय काळे व दिघे सर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.त्यांनी पर्यावरण संवर्धन,वृक्षसंवर्धन तसेच पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच सीएमआरसीचे उपजीविका विकास सल्लागार आकाश लोंढे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक सहभागाचे महत्त्व उपस्थितांना पटवून देत मार्गदर्शन केले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते शंभर विविध वृक्षांचे वाटप करण्यात आले.तसेच या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेऊन वृक्ष लागवड व संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास लेखापाल सौ.सविता क्षीरसागर, सौ.मनीषा गवळी,सौ.गौरी माने-देशमुख (CRP) तसेच विविध बचत गटांच्या अध्यक्षा,सचिव व गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.यावेळी उपस्थित बचत गटातील महिलांनी पर्यावरण संवर्धनासाठी अधिकाधिक वृक्ष लागवड करणे व त्या वृक्षाचे संगोपन करण्याचा संकल्प केला.या कार्यक्रमाचे नियोजन सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापक तनुजा पाटील यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!