महाराष्ट्र

शाळेतून घरी जाताना विद्यार्थ्याचा भीषण अपघातात मृत्यू

डिव्हीपी बँकेसमोर भीषण अपघात; ११ वर्षीय राजवीरचा जागीच मृत्यू

नांदोरेत शालेय मुलाचा पिवळ्या स्कुलबसच्या चाकाखाली मृत्यू; चालकावर गुन्हा
वाहकाविना पाठीमागे घेतलेल्या पिवळ्या स्कुलबसने घेतले ११ वर्षीय राजवीरचे आयुष्य

पंढरपूर, दि. 13 (प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील नांदोरे येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात शालेय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. ही घटना दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारास ४ वाजता डिव्हीपी मल्टीस्टेट बँकेसमोर घडली.

मृत विद्यार्थ्याचे नाव राजवीर दयानंद कदम (वय ११ वर्षे, रा. नांदोरे, ता. पंढरपूर) असे आहे. तो शाळा सुटल्यावर सायकलवरून आपल्या घरी जात असताना हा अपघात झाला. या दरम्यान नांदोरे ते पेहे जाणाऱ्या रस्त्यावर उभ्या असलेल्या पिवळ्या रंगाच्या स्कुलबस (आरटीओ क्रमांक MH-17 T-4111) ला बसचालकाने मागे घेत असताना ही दुर्दैवी घटना घडली.

सदर स्कुलबस वाहकाविना (कंडक्टरशिवाय) चालवली जात होती. चालक भाऊसाहेब बिभीषण साळुंखे (रा. नांदोरे) यांनी निष्काळजीपणे आणि हयगयीने बस पाठीमागे घेताना सायकलवरून घरी जाणाऱ्या राजवीर कदमला धडक दिली. बसच्या पाठीमागील उजव्या बाजूच्या चाकाखाली राजवीरचा समावेश झाला आणि त्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर परिसरात एकच हळहळ पसरली असून गावात शोककळा पसरली आहे. मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेनंतर राजवीरचा चुलता रामदास आण्णासो कदम (वय ३२, रा. नांदोरे, ता. पंढरपूर) यांनी करकंब पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार बसचालक भाऊसाहेब साळुंखे आणि संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे.

करकंब पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३१३/२०२५ भा.दं.वि. कलम ३०४(अ), २७९, तसेच मोटार वाहन कायद्यान्वये कलम १८४ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार (पोकॉ) आसीफ आतार (क्रमांक ६७२) हे करीत आहेत.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर, पोलीस उपनिरीक्षक निलेश गायकवाड, तसेच पोलीस कर्मचारी अरुण राजकर, बापूसाहेब मोरे, सागर सावंत, महबूब इनामदार, सचिन साळुंखे, स्वप्नील बागल, धनाजी सुर्वे, महेश बोंगाणे आदींनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

🚸 अपघात प्रतिबंधासाठी शालेय विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी :

या दुर्दैवी घटनेनंतर परिसरातील पालक आणि शाळा प्रशासनात चिंता निर्माण झाली असून तज्ज्ञांनी शालेय विद्यार्थ्यांना खालील सुरक्षेच्या सूचना दिल्या आहेत :

वाहनचालकांनी मागे घेताना वाहनाच्या मागे कोण आहे याची खात्री करावी. रस्ता ओलांडताना दोन्ही बाजू पाहूनच पुढे जावे.,शाळा सुटल्यानंतर गेटच्या समोर किंवा बसच्या मागे उभे राहू नये.सायकल चालवताना दोन्ही हात ब्रेकवर ठेवावेत आणि लक्ष रस्त्यावर असावे. प्रत्येक शाळेने स्कुलबसला वाहक ठेवणे बंधनकारक आहे, ही अट काटेकोरपणे पाळली जावी. पालकांनी मुलांना ट्रॅफिक सिग्नल, ब्रेक वापर, आणि रस्ते सुरक्षा नियमांचे महत्त्व समजवावे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!