महाराष्ट्र

अकलूज पोलीस व आरटीओचे संयुक्त मार्गदर्शन; अपघातमुक्त हंगामाचा कारखान्याचा संकल्प

ऊस वाहतूक सुरक्षिततेसाठी रिफ्लेक्टर बसविणे व नियम-जागरूकता अभियान संपन्न

सहकार महर्षी कारखान्यात वाहतूक सुरक्षा शिबिर; शेकडो वाहनचालकांना मार्गदर्शन

सहकार महर्षी कारखान्यामध्ये वाहतूक सुरक्षा नियम मार्गदर्शन शिबिर व वाहनांना रिफ्लेक्टर बसविणे कार्यक्रम संपन्न

अकलूज (प्रतिनिधी – केदार लोहकरे) शंकरनगर–अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२५–२६ सुरू झाला असून, ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी कारखाना प्रशासनाने वाहतूक सुरक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले. या शिबिरास अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरज उबाळे तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांचे प्रतिनिधी, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शितल शिंदे उपस्थित होत्या.

या प्रसंगी ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व ट्रॅक्टर–ट्रॉली चालकांना सुरक्षिततेचे नियम, दक्षता आणि वाहन चालविताना घ्यावयाची विशेष काळजी याबाबत तपशीलवार मार्गदर्शन करण्यात आले.  त्यांनी वाहनाचा वेग नियंत्रित ठेवणे, योग्य दिशेने वाहन चालवणे, रिफ्लेक्टरचा योग्य वापर, ट्रॅक्टरला दोनपेक्षा जास्त ट्रॉली न जोडणे, वाहन चालविताना मद्यपान व मोबाईल फोनचा वापर टाळणे, क्षमतेपेक्षा जादा ऊस वाहून न नेणे, विना-पासिंग वाहन वाहतुकीसाठी न वापरणे आदी महत्त्वाच्या सूचना दिल्या.
वाहनाच्या टेप रेकॉर्डरचा आवाज नियंत्रित ठेवण्यावरही भर देण्यात आला. या मार्गदर्शनामुळे अपघातांची शक्यता कमी होऊन जीवितहानी, गुन्हे नोंदणी व वाहनांचे नुकसान टाळता येईल, असा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमामध्ये कारखान्याचे शेती अधिकारी समाधान चव्हाण यांनी पोलीस व परिवहन विभागातील अधिकाऱ्यांचे स्वागत केले. त्यांनी सांगितले की, कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेअरमन जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखाना शिस्तबद्ध परंपरेनुसार अपघातमुक्त कामकाज करण्यावर भर देत आहे.

संचालिका कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या संकल्पनेतून हे शिबिर राबविले गेले असून, ऊस वाहतुकीदरम्यान नागरिकांना त्रास होऊ नये आणि अपघात टळावेत, यासाठी चालकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागृती निर्माण करणे हा यामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला कारखान्यातील ऊस तोडणी–वाहतूक कॉन्ट्रॅक्टर, मुकादम, वाहन चालक–मालक तसेच शेती विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिर यशस्वीरीत्या पार पडल्याने वाहन चालकांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण दिसून आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!