श्रीपूर-अकलूज रोडवर पुन्हा अपघात; शाळेजवळ चारचाकी रस्त्याच्या खाली
पूर्वीचा खालच्या बाजूचा रस्ता गायब, गेल्या अनेक अपघातांचे मुख्य कारण

सिंगल रोडवर वाढते अपघात; स्थानिकांकडून तात्काळ उपाययोजनांची मागणी
(इन महाराष्ट्र न्यूज साठी दत्ता नाईकनवरे)
श्रीपूर ता. माळशिरस : श्रीपूर-अकलूज रोडवरील इंदिराबाई इंग्लिश मीडियम स्कूलच्या जवळ आज सकाळी पुन्हा एक अपघात घडला. चार चाकी वाहन रस्त्याच्या डाव्या बाजूला खाली गेल्याने मोठे नुकसान झाले. सुदैवाने चालक सुखरूप आहे. रस्त्यालगत डाव्या बाजूला असलेल्या खोल चारीमध्ये गाडी गेली, तसेच पलीकडे असलेल्या खोलचारी, झाडेझुडपांमुळे वाहनाचे नुकसान झाले. या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे.
पूर्वीचा मुख्य रस्त्याच्या खालच्या बाजूला असणारा जुना बैलगाडी रोड गायब झाल्यामुळे, मागील अनेक अपघातांचे मुख्य कारण, दुतर्फा अतिक्रमणे, आवश्यक ठिकाणी गतिरोधकांचा अभाव, रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या मुरमाची निकृष्ट दुरुस्ती, लोलरने योग्य रोलिंग न होणे, अवजड वाहनांची प्रचंड वाहतूक – या सर्व कारणांमुळे श्रीपूर-अकलूज रोडवर वारंवार अपघात होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
भाडगर कॅनॉल लगतच्या या सिंगल रोडवर मोठ्या वाहनांची वाहतूक वाढल्याने धोका आणखी वाढत चालला आहे. स्थानिक नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संबंधित विभागाने तात्काळ सुधारणा कराव्यात, तसेच सुरक्षिततेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.



