महाराष्ट्र

हिवाळी अधिवेशनात आ.अभिजीत पाटील आक्रमक; महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीसाठी कोटींचा निधी मागितला

मतदारसंघातील विकासकामांसाठी मोठ्या निधीची प्रभावी मागणी

महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीत दोन कर निरीक्षक पदे मंजूर; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर आमदार पाटीलांची ताशेरेबाजी

[दत्ता नाईकनवरे,संपादक-इन महाराष्ट्र न्यूज]

महाळुंग-श्रीपूर १३४ कोटींचा पाणीपुरवठा प्रकल्प, आमदार अभिजीत  पाटील यांची दमदार मांडणी

नागपूर  : हिवाळी अधिवेशनात माढा विधानसभेचे आमदार अभिजीत पाटील यांनी आपला मतदारसंघ विकासाच्या मार्गावर अधिक वेगाने पुढे जावा यासाठी अनेक महत्त्वाच्या मागण्या सरकारसमोर ठामपणे मांडल्या. मतदारसंघातील प्रलंबित कामे, प्रस्ताव आणि निधीअभावी अडकलेले प्रकल्प यावर त्यांनी लक्ष वेधले. 

महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीसाठी जागा खरेदी करण्यासाठी एक कोटी रुपयांच्या निधीची मागणी त्यांनी सभागृहात केली. तसेच नगरपंचायत इमारत उभारण्यासाठीही भरघोस निधी मंजूर करावा, असे स्पष्टपणे मांडले.

महाळुंग-श्रीपूर साठी तयार असलेला १३४ कोटी रुपयांचा पाणीपुरवठा प्रकल्पाचा प्रस्ताव आपल्या कडे सादर असून त्यास तातडीने मंजुरी द्यावी, अशी ठोस आठवण आमदार पाटील यांनी अधिवेशनात करून दिली.

मोडनिंब, करकंब आणि टेंभुर्णी नगरपंचायतींच्या प्रस्तावातील सर्व त्रुटी दुरुस्त झाल्या असून हा प्रस्ताव सध्या नगरविकास मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. हा प्रस्ताव मंजूर करून या तीनही ठिकाणी नगरपंचायती लवकरात लवकर स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीसाठी आकृतीबंधही तयार झाला असून कर निरीक्षकाच्या दोन जागा मंजूर झाल्या आहेत. मात्र, नियुक्त अधिकाऱ्यांमध्ये ऋतुजा गायकवाड आठवड्यातून केवळ एक दिवस उपस्थित राहतात, तर नूतन जाधव अद्याप कामावर रुजू झालेल्या नाहीत, अशी स्थिती आम्ही सरकारसमोर मांडली असल्याची माहितीही आमदार पाटील यांनी दिली.

अनेक महत्त्वाच्या विकासकामांसाठी भरघोस निधी देऊन गती देण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करत त्यांनी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासावर सरकारने लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी अधिवेशनात परिणामकारकपणे मांडली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!