16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणीचा निर्णय दोन आठवड्यात घ्या – सुप्रीम कोर्ट
अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली

अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस
महाराष्ट्र : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल 11 मे रोजी लागला, यानंतर देखील आमदारांच्या अपात्रतेची कारवाई करण्याविषयी हालचाली झाल्या नाहीत. म्हणून ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घ्यावा यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा यासाठी याचिका दाखल केली होती, या संदर्भात सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी होऊन 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. योग्य कारवाई संदर्भात उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. एकनाथ शिंदेंसह व सोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. परंतु यासाठीचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असल्याचे सुप्रीम कोर्टाने जजमेंट मध्ये सांगितले होते. या सुनावणीला आता जवळपास तीन महिने होत आले तरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे ठाकरे गटाने विधानसभा अध्याक्षांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी पार पडली. अध्यक्षांना तातडीने निर्णय घ्यावा अशी विनंती या याचिकेमध्ये केली होती. यावर आज सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी दोन आठवड्यात लेखी उत्तर द्यावं अशी नोटीस बजावली आहे. याचिकेमध्ये ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्ष निष्क्रियता आणि पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप केला आहे.