महाराष्ट्र

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर “गौरी” ने गाठले यशाचे शिखर

अकलूज येथील छोट्याशा चहाटपरी वाल्याची मुलगी झाली-इंजिनिअर

अकलूज येथील छोट्याशा चहाटपरी वाल्याची मुलगी झाली-इंजिनिअर

अकलूज : माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे राजू काटे व राजश्री काटे या पती पत्नीने छोटेसे चहाचे दुकान आहे.घरची परिस्थिती गरिबीची पण मुलीला इंजिनिअर करण्याचे या दोघांची तीव्र इच्छा होती.त्यांच्या या निर्णयाला त्यांची मुलगी गौरी हिने प्रतिसाद देत आई वडीलांच्या कष्टाचे चीज करत आज तीने त्यांचे स्वप्न हि पुर्ण तर केले आहे.आज ती इंजिनिअरचे शिक्षण पुर्ण करत रिझल्ट लागण्यापूर्वी पुण्यातील एका खाजगी नामांकित कंपनीत नोकरीला हि लागली आहे.

घरात आई वडीलांचे जेमतेम शिक्षण झाले आहे.पण मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप काबाडकष्ट केले आहे.आईने शिलाई मशिनवर लोकांचे कपडे शिवून दिले.कधी कधी जुन्या कापडे व साड्यांची गोधडी शिवून दिली.कापडी पिशव्या शिवण्याचे काम हि केले आहे.गौरीच्या शिक्षणासाठी आईने किराणा मालाच्या दुकानात हि काम केले आहे.वडिलांनी तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाजी विकण्याचे काम केलेले आहे.मुलीच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू लागल्यामुळे शेवटी या पती पत्नीने स्वतःचे छोटेसा हाॅटेलचा व्यवसाय सुरू केला.त्यामुळे मुलीचे शिक्षण पुर्ण झाले आहे.

ग्रामीण भागात मुलींना शिक्षणासाठी बाहेरगावी ठेवायला गरीब घरातील पालक सहसा लवकर तयार होत नाहीत.पण मुलीच्या जिद्दीपुढे आई वडीलांना माघार घ्यावी लागली.आज त्यांची मुलगी गौरी काटे हिने साॅफ्टवेअर इंजिनिअर शिक्षण पुर्ण केले असून ती आता स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे.

गौरी काटे हिचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण अकलूजच्या जिल्हा परिषद मुलींची शाळा नं.२ येथे प्राथमिक शिक्षण झाले आहे.त्यानंतर इयत्ता आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण जिजामाता कन्या प्रशालेत झाले आहे तर अकरावी व बारावीचे सायन्स विभागातून शिक्षण सदाशिवराव माने विद्यालयात झाले.पुढील इंजिनिअर काॅलेजचे शिक्षण कोल्हापूरच्या डी.वाय.पाटील इंजिनिअर काॅलेजमधून साॅफ्टवेअर इंजिनिअर झाले आहे.इंजिनीयर शिक्षणाचा निकाल येण्या अगोदर पुणे येथील डाटा मोटो आयटी कंपनीत तिची निवड होऊन नोकरीला लागली असून आता ती स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!