श्रीपूर मध्ये बारावीच्या परीक्षा केंद्रावरती विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत
बारावीच्या परीक्षा शांततेत, तणावमुक्त व सुरळीत सुरू

बारावी परीक्षार्थ्यांना फूल अन् शुभेच्छाही
401 विद्यार्थी, विद्यार्थिनी बारावीची बोर्डाची परीक्षा देत आहेत
श्रीपूर तालुका माळशिरस येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालया मध्ये इयत्ता बारावीचे परीक्षा केंद्र आहे. पहिल्या इंग्रजी विषयाच्या पेपर दिवशी सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींचे कॉलेज प्रशासनाकडून गुलाब पुष्प देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त, शांततेत, प्रसन्न वातावरणामध्ये परीक्षा द्याव्यात यासाठी आनंदी वातावरणामध्ये त्यांना परीक्षा हॉलमध्ये पाठवण्यात आले. या परीक्षा केंद्रावरती शांततेत व सुव्यवस्थेत परीक्षा सुरू आहेत. नेवरे, बोरगाव आणि श्रीपूर ज्युनिअर कॉलेजमधील 401 विद्यार्थी या परीक्षा केंद्रावर परीक्षा देत आहेत.
पहिल्या पेपर दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य पांडुरंग बनसोडे, बोरगाव येथील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गाडे सर, चीफ कंडक्टर प्रा.सुनील हसबे, बिल्डिंग कंडक्टर प्रा.गोरख कापरे, प्रा.सुनील गवळी, सिताराम गुरव, सुधाकर कांबळे, P G कुलकर्णी सर्व उपस्थित शिक्षक व शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष दत्ता नाईकनवरे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय दोरगे, सहसचिव बाळासाहेब भोसले, सदस्य असिफ शेख या सर्वांनी पहिल्या पेपर दिवशी परीक्षा केंद्रावरती सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
परीक्षा केंद्रावरती अकलूज-श्रीपूर पोलीस स्टेशनकडून बंदोबस्त चोख ठेवला आहे. भरारी पथक, बैठे स्कॉड अशी पथके नेमण्यात आली आहेत. शांततेत आणि कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.