महाराष्ट्र

दांडिया महोत्सव महाळुंग-श्रीपूर जल्लोशात संपन्न | Dandiya 2023 | Mahalung-Shreepur

दांडिया महोत्सव पाहून ग्रामस्थ व भाविक भक्तांनी समाधान व्यक्त केले.

महाळुंग यमाईदेवी मंदिराच्या प्रांगणामध्ये भव्य दांडियाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

महाळुंग तालुका माळशिरस नवरात्र उत्सवानिमित्त महाळुंग येथील यमाईदेवी मंदिराच्या प्रांगणामध्ये भव्य दांडिया (Dandiya) महोत्सव कार्यक्रम जल्लोशात संपन्न झाला. नवरात्रीच्या ९ दिवसात महाळुंग यमाईदेवी मातेच्या ९ रुपांची भक्तिभावाने पुजा करुन उत्साहपूर्ण वातावरणात महाळुंग मध्ये नवरात्रोत्सव मोठ्या आनंदात  सुरू आहे. देवीची नित्यपूजा, छबिना, त्याचबरोबर  सर्व भाविक भक्तांचे लक्ष वेधले त्यामध्ये भव्य दांडियाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विविध रंगांच्या प्रकाश झोतामध्ये दांडिया रास आणि गरबांच्या पारंपारिक वेशभूषित नटलेल्या महिला मुली यांच्या खेळाकडे भाविक भक्तांनी, ग्रामस्थांनी लक्ष वेधले. दांडिया नृत्याविष्कारात दंग झालेले खेळाडू आणि भारावलेले प्रेक्षक यामुळे या वर्षाची सायंकाळ अविस्मरणीय ठरली. महिला व मुलींनी मोठ्या संख्येने दांडिया महोत्सवा मध्ये सहभाग नोंदविला होता.

कार्यक्रमाचा शुभारंभ अकलूज पोलीस स्टेशनच्या पीएसआय स्वाती सुरवसे मॅडम, एस आय टी च्या पीएसआय तृप्ती भिसे मॅडम, नगराध्यक्षा लक्ष्मी चव्हाण, नगरसेविका शारदाताई पाटील, ज्योती राहुल रेडे, नगरसेविका जोशना सावंत-पाटील, नगरसेविकास सविता रेडे, नगरसेविका तेजश्री लाटे, शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वीरपत्नी सुरेखा जाधव, उपाध्यक्षा सविता नाईकनवरे,  सचिव सारिका नाईकनवरे, गायत्री पाटील, दिपाली पाटील, ईसरकर मॅडम, यांच्या शुभहस्ते दांडियाचे पूजन करून करण्यात आला. गृहिणी, सामाजिक, राजकीय, पोलीस प्रशासनातील व शालेय विद्यार्थिनींनी यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन गाणी आणि संगीताच्या तालावर दांडियाचा ठेका धरला. महाळुंग यमाईदेवीच्या प्रांगणामध्ये सर्व महिलांनी व मुलींनी दांडीयाचा खेळ खेळून आनंद व्यक्त केला व देवीचा जागर केला. दांडिया महोत्सव पाहून ग्रामस्थ व भाविक भक्तांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी नगरसेवक गटनेते राहुल रेडे, नामदेव पाटील, रावसाहेब सावंत-पाटील, शिवाजी रेडे, मौला पठाण, पैलवान अशोक चव्हाण, प्राचार्य पांडुरंग बनसोडे, प्रशिक्षक हेमंत पाटील, सुनील गवळी सर, अंजली गवळी मॅडम, कविता गुरव मॅडम, दिपाली पाटील,  प्रेरणा जाधव,. प्रशिक्षिका अंजली माने, शिरीष खोत सर, सागर पाटील,  कापरे सर,  मिसाळ सर, रवींद्र नाईकनवरे, धर्मेश जाधव, रोहित पाटील, आबा कांबळे, दत्ता नाईकनवरे, विष्णुपंत रेडे, आबा चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते,   कार्यक्रमाचे आयोजन नगरसेविका शारदाताई नामदेव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाळुंग-श्रीपूर, शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान व  बहुउद्देशीय संस्था, कर्तव्य सामाजिक सेवाभावी संस्था, श्री चंद्रशेखर विद्यालय व  नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय, श्रीपूर यांनी केले होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!