दहावी बोर्ड परीक्षे मध्ये श्री चंद्रशेखर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळाले घवघवीत यश | SSC Result 2024
ईशांत संजय जाधव ला मिळाले सर्वाधिक गुण | शेकडा निकाल ९९.१६ टक्के

श्रीपूर ता. माळशिरस : शिक्षणामधील अतिशय महत्त्वाचा टप्पा असणारा दहावीबोर्ड परीक्षेचा निकाल, आज बोर्डाकडून ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले आहे. विद्यालया मधून मार्च 2024 इयत्ता दहावी मध्ये एकूण २३९ विद्यार्थी परीक्षेस बसले त्यापैकी २३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शेकडा निकाल ९९.१६ टक्के लागला आहे.
विद्यालया मधून क्रमानुसार पुढील विद्यार्थ्यांना सर्वाधिक गुण मिळाले आहेत.
विद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थी
१) चि.जाधव ईशान संजय -९५.४०%
२) चि.घोडके सुदेश महेश-९४.८०%
३) कु.खोत सायली जांबुवंत -९४.६०%
४) कु.गायकवाड मोहिनी बाळू-९४.२०%
४) कु.पवार प्रेरणा सर्जेराव-९४.२०%
५) कु.लोखंडे आरती धनंजय-९३.८०%
५) चि.बाड प्रणव मोहन-९३.८०%
विद्यालयातील मागासवर्गीयातून प्रथम तीन विद्यार्थी
१) कु.गायकवाड मोहिनी बाळू-९४.२०%
२) कु.लोखंडे आरती धनंजय-९३.८०%
३) कु.महादार रेवती अमित-९१.२०%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.रामदास आबासाहेब देशमुख, उपाध्यक्षा शुभांगीताई रामदास देशमुख, सचिव भारत कारंडे, सदस्य यशराज(भैय्या) देशमुख, प्राचार्य पां.बा. बनसोडे, पर्यवेक्षक न.ह.अधटराव, क.महा.प्रमुख सु.मा.गवळी, सं.मान्य पर्यवेक्षक सि.भा.गुरव व प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक- शिक्षकेत्तर सेवक, शिक्षक- पालक संघ कार्यकारणी सर्व अधिकारी व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती कार्यकारणी सर्व अधिकारी व सदस्य यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.