निरोगी आरोग्य असणारी युवापिढी देशाची उन्नती करणार-डॉ.चिराग होरा
महाळुंग-श्रीपूर आरोग्यवर्धिनी केंद्रात महाआरोग्य शिबिर संपन्न

महाळुंग-श्रीपूरआरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये जागरूक पालक – सुदृढ बालक अभियानाचा शुभारंभ
निरोगी आरोग्य आणि मन असणारी युवापिढी देशाची उन्नती करणार-डॉ.चिराग होरा
श्रीपूर तालुका माळशिरस येथील महाळुंग-श्रीपूर आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना “भारत देश हा जगामध्ये सर्वात जास्त युवक असणारा देश आहे, या युवकांचे आरोग्य आणि मन जर निरोगी सदृढ असेल तर नक्कीच भारत देश जगामध्ये सर्वाधिक प्रगती, उन्नती करणार आहे. त्यासाठी आपण निरोगी राहणे आणि अशा प्रकारे शासनाने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचा लाभ घेणे आवश्यक आहे.” असे मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अकलूज येथील सुप्रसिद्ध फुफ्फुस रोग तज्ञ डॉ. चिराग होरा यांनी केले. यावेळी श्रीपूर मधील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.रूपाली दादासाहेब पराडे-पाटील यांनी गरोदर मातांना घ्यावयाची काळजी, आपला आहार, नियमित तपासण्या याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी श्रीपूर येथील आरोग्य केंद्रामध्ये जागृत पालक- सुदृढ बालक या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. एक ते अठरा वर्षा मधील सर्व मुला-मुलींची तपासणी करणेच्या उद्देशाने हे अभियान सुरू करण्यात आले आहे. याचा शुभारंभ अकलूजचे फुफुस रोग तज्ञ डॉ. चिराग होरा, स्त्रीरोग तज्ञ डॉ.रूपाली दादासाहेब पराडे-पाटील, महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा लक्ष्मीताई अशोक चव्हाण, डॉ.संजय लाटे, पैलवान अशोक चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ.भारत गायकवाड, नाना बनसोडे, अरविंद साठे, दत्ता नाईकनवरे या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारत गायकवाड, कनिष्ठ सहाय्यक दत्तात्रय गवळी, आरोग्य सहाय्यक दीपक चव्हाण, फरीदा पठाण मॅडम, फार्मासिस्ट सुजित फुले, आरोग्य सेवक संजय संपकाळ, सुमित तांबोळी, आरोग्य सेविका विद्या वाघमारे, प्रेमा देशमुख, प्रवीण शेख, पूजा चव्हाण, गणेश गजाकस आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. यावेळी परिसरातील अंगणवाडी सेविका, अशा सेविका, स्थानिक ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सेवक संजय संपकाळ यांनी केले.