माळशिरस तालुक्यात कोरोनाची सद्यस्थिती | Corona 2025
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रियांका शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाची एन्ट्री | माळशिरस तालुक्यात दोन रुग्ण | एक अकलूज, एक माळीनगर मध्ये | घाबरू नका, काळजी घ्या | तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रियांका शिंदे | पंढरपूर वारीच्या धरतीवर आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासन सज्ज |
सध्या तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी देत आहेत. एक रुग्ण अकलूजमध्ये तर दुसरा माळीनगरमध्ये आहे. दोन्ही रुग्ण खाजगी रुग्णालयात दाखल असून त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शन, औषधे आणि चाचणी किटची मागणी केली आहे. सर्दी, ताप, खोकला असणाऱ्यांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. येणाऱ्या वारीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यावर भर दिला जात आहे, ज्यात मास्क वापरणे आणि सॅनिटायझरचा उपयोग करणे आवश्यक आहे. आशा कार्यकर्त्यांद्वारे घरोघरी जाऊन माहिती दिली जात असून, रुग्णांच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन राहण्यास सांगितले आहे.
घाबरू नका; सावधागिरी बाळगा
अकलूज – माळशिरस तालुक्यातील राऊतनगर-अकलूज व माळीनगर येथे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी प्रियांका शिंदे यांनी पत्रकारांना दिली.
सदरच्या रुग्णांनी प्रकृती अस्वथ्यामुळे खाजगी ऐपेक्स हॉस्पिटल व -हीदम हॉस्पिटल येथे उपचारासाठी भरती झाले असता खाजगी लॅब मध्ये तपासणी केली. त्यामध्ये कोरोना पॉसिटीव्ह असल्याचे आढळून आले. याची खबर माळशिरस तालुका आरोग्य विभागाला लागताच त्यांनी सदर दोन्ही कुटुंबातील व्यक्तींची पूर्ण तपासणी केली आहे. यातील एका रुग्णाची प्रवास केल्याची पार्स्वभूमी असल्याचे आढळून आले आहे.
याबाबत बोलताना डॉ. शिंदे म्हणाल्या, सदर दोन रुग्णांची माहिती आम्ही सोलापूर जिल्हा चिकित्सकांना दिली आहे. आता शासन स्तरावरून येणाऱ्या पुढील सूचनाची आम्ही वाट बघत आहोत. सद्य स्थितीमध्ये कोरोनाची उपाय योजना म्हणून आम्ही जिल्हा आरोग्य विभागाकडून 25 हजार रॅट किट, 10 हजार आर टी पी सी आर ट्यूब, 10 हजार एन 95 मास्क, 50 हजार सर्जिकल मास्क, 500 पी पी इ किट, 100 एम एल च्या 1000 बॉटल सैनिटायजर, 10 हजार हॅन्ड ग्लोज ची मागणी केली आहे. येणाऱ्या पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला अतिदक्षता बाळगावी लागणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विषयक काळजी घ्यावी. लक्षणे आढळताच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.