मुलांच्या कलेला चालना देण्यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन – डाॅ.धवलसिंह मोहिते-पाटील
बाल चित्रकला स्पर्धचे उदघाटन

शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी कलेच्या माध्यमातून आपले छंद जोपासावेत.डाॅ.धवलसिंह मोहिते पाटील
संग्रामनगर दि.१० (केदार लोहकरे) माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या ४४ व्या पुण्यतिथीनिमित्त सोलापूर जिल्हा जनसेवा संघटनेच्या वतीने माळशिरस तालुका बाल चित्रकला स्पर्धचे उदघाटन सोलापूर जिल्हा काँग्रेस कमेटीचे जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. अकलूज येथील सदुभाऊ सांस्कृतिक भवन येथे या चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या.या बाल चित्रकला स्पर्धेत तालुक्यातील ५५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.यंदाचे या स्पर्धेचे ४४ वर्ष आहे.
डॉ.धवलसिंह मोहिते पाटील पुढे म्हणाले की,लहान वयात मुलांच्या कलेला चालना देण्याचे काम जनसेवा संघटनेच्या माध्यमातून लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते यांनी गेली ४३ वर्षापुर्वी सुरू करण्यात आले आहे.या चित्रकला स्पर्धेतून उद्याचे उदयमुख कलाकार निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाची सुरुवात सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व स्व.प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सदाशिवराव माने विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव पाटील सर, जनसेवा संघटनेचे उपाध्यक्ष अण्णासाहेब इनामदार, जिल्हा सरचिटणीस सुधीर रास्ते, युवक संघटनेचे सरचिटणीस मयूर माने, उपाध्यक्ष राजाभाऊ गुळवे, रणजीतसिंह देशमुख,दिपक सुत्रावे, मोहसिन शेख, श्रीमती साळुंखे मॅडम, सदाशिवराव माने विद्यालय प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती नुरजहाॅं शेख, काशिद सर, धोत्रे सर, उपस्थित होते .