सोपा,अवघड, लिहिण्यासाठी वेळच पुरला नाही | इ.12 वी बोर्ड इंग्रजीचा पेपर.
आज पासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू

बारावीचा पहिला पेपर विद्यार्थ्यांना असा गेला
विद्यार्थ्यांनी दिल्या प्रतिक्रिया
आजपासून सर्वत्र इयत्ता बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. आज इंग्रजीचा लेखी पेपर सर्व परीक्षा केंद्रांवरती विद्यार्थ्यांनी दिला. कोरोना नंतर साधारण अडीच, तीन वर्षानंतर ही लेखी तीन तासाची परीक्षा होत आहे. परीक्षा संपल्यानंतर केंद्राच्या बाहेर विद्यार्थ्यांनी येताना काही विद्यार्थ्यांना पेपर सोपा, तर काही जणांना खूप अवघड गेला. तर काही जणांना लिहिण्यासाठी वेळच मिळाला नाही असा संवाद आपल्या मित्रांसोबत, पालकांसोबत परीक्षार्थी विद्यार्थी करताना दिसून आले.
एकंदरीत जे विद्यार्थी रेगुलर हजर असून नियमित अभ्यास करत होते त्यांना सदर पेपर सोपा गेला आहे. तर ज्यांनी फक्त परीक्षा पुरते पेपर देण्यासाठी आले होते त्यांना पेपर नक्कीच अवघड गेलेला होता. तर काही विद्यार्थ्यांना लिखाणाचा सराव कमी पडल्यामुळे लिहिण्यासाठी वेळ देखील कमी पडला असे चित्र अनेक परीक्षा केंद्रांवरती पहिल्या दिवशी इंग्रजीचा पेपर सुटल्यानंतर पहावयास मिळाले.