देश विदेश

डॉ.यशवंत कुलकर्णी यांना दिल्लीमध्ये STAI कडून ‘इंडस्ट्रिय एक्सलन्स’ पुरस्कार प्रदान

साखर क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान

साखर क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान

दिल्ली | प्रतिनिधी |  संपादक : दत्ता नाईकनवरे

तंत्रज्ञानाची प्रभावी अंमलबजावणी, उत्कृष्ट व्यवस्थापन,  सतत साखर उद्योगात नवीन प्रयोग,  याची दखल घेत इंडस्ट्रिय एक्सलन्स अवॉर्डने सन्मान

श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांना दिल्ली मध्ये आज शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया (STAI) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य राष्ट्रीय साखर परिषदेमध्ये कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांना ‘इंडस्ट्रिय एक्सलन्स अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात आले. साखर उद्योगात त्यांनी सातत्याने केलेल्या नवीन कार्यामुळे, तंत्रज्ञानाच्या प्रभावी अंमलबजावणी मुळे तसेच उत्कृष्ट व्यवस्थापन क्षमतेमुळे त्यांचे कार्य देशभरात कौतुकास पात्र ठरले आहे.

हा पुरस्कार देताना सहकार क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार जयंतराव पाटील, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे महासंचालक संभाजी कडू पाटील आणि STAI चे अध्यक्ष संजय अवस्थी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सर्वांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह देऊन डॉ. यशवंत कुलकर्णी यांना गौरवण्यात आले.

देशभरातील साखर उद्योगातील शेकडो कार्यकारी संचालक, अभियंते, धोरणकर्ते व तज्ज्ञ यांच्या उपस्थितीत डॉ. यशवंत कुलकर्णी यांना पुरस्कार प्रदान करताना उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट करत अभिवादन केले. या कार्यक्रमात डॉ. कुलकर्णी यांच्या साखर उद्योगातील आधुनिक दृष्टीकोन, ऊर्जानियंत्रण प्रणालीतील प्रभावी बदल, आणि निसर्गपूरक उत्पादन प्रक्रियेवर भर यांची विशेष दखल घेण्यात आली.

डॉ. कुलकर्णी यांनी आपल्या सततच्या अभ्यासू वृत्तीने, संघटन कौशल्याने आणि नवनवीन प्रयोगांनी संपूर्ण साखर क्षेत्रात प्रेरणादायी ठसा उमटवला आहे. हा पुरस्कार त्यांच्या नेतृत्वगुणांचे आणि कार्यक्षमतेचे राष्ट्रपातळीवरील सन्मानच आहे, असे प्रतिपादन STAI च्या पदाधिकाऱ्यांनी आणि उपस्थित मान्यवरांनी यावेळी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!