जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धेत श्री चंद्रशेखर विद्यालय, श्रीपूर 3 गोल्ड, 2 ब्राँझ
सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळांचा ज्यूदो स्पर्धेमध्ये सहभाग

मुला मुलींच्या दोन दिवस सुरू होत्या स्पर्धा
श्रीपूर तालुका माळशिरस येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय यांनी सोलापूर जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धेचे आयोजन गणेश हॉल श्रीपूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शालेय शाळेतील शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. एक दिवस मुलांच्या व दुसऱ्या दिवशी मुलींच्या ज्यूदोच्या स्पर्धा संपन्न झाल्या.
कार्यक्रमाचा बक्षीस वितरण समारंभ माळशिरस तालुक्याच्या क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे छत्रपती पुरस्कार विजेत्या व इंटरनॅशनल खो-खो प्लेयर, सत्तेन जाधव पंढरपूर तालुका क्रीडा अधिकारी, मोहन यादव कुस्ती क्रीडा मार्गदर्शक , ओमप्रकाश पवार जे एफ आय नॅशनल रेफरी, प्राचार्य पांडुरंग बनसोडे, महायोद्धा ज्युदो फाउंडेशन पंढरपूरचे कोच योगेश भोसले सर, प्रगतशील बागायदार नामदेव पाटील, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय दोरगे, सचिव बाळासाहेब भोसले, यांच्या शुभहस्ते विजेत्या खेळाडूंना बक्षिसे व मेडल देऊन बक्षीस समारंभ पार पडला.
यामध्ये श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयातील विविध वजन गटांमध्ये विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले त्यामध्ये 14 वर्षे वयोगटांमध्ये 27 किलो वजना खालील इंदिराबाई आगाशे इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी बाजीराव दगडे हिला गोल्ड मेडल व विभागासाठी पात्र झाली. त्याचबरोबर माध्यमिक विभागातील दिव्या रामचंद्र जाधव हिने 63 किलो खालील वजन गटात गोल्ड मेडल मिळवून विभागासाठी निवड, तसेच 17 वर्ष वयोगटामध्ये 70 किलो वजन गटात ऋतुजा शहाजी जाधव हिने तृतीय क्रमांक घेऊन ब्राँझ मेडल मिळवले व 19 वर्ष वयोगटात 66 किलो वजन गटाखालील सामन्यात कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी महेश मधुकर कांबळे याने गोल्ड मेडल मिळवून याचीही विभाग स्तरासाठी निवड झालेली आहे. तसेच श्रुती शिवाजी कदम हिने 44 किलो वजनगटामध्ये ब्रांँझ पदक प्राप्त केले.
यावेळी महादेव ताकतोडे कराटे प्रशिक्षक, श्रीकांत चौधरी कोच, अजित बनकर क्रीडाशिक्षक वेळापूर, पर्यवेक्षक नवनाथ अधटराव, प्रा.सुनील गवळी, सिताराम गुरव, समन्वयक प्रा.सुधाकर कांबळे, क्रीडा शिक्षक विजयकुमार केचे, शामराव धाराव, महिला क्रीडा शिक्षिका करुणा धाइंजे, हनुमंत मोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर शालेय ज्यूदो क्रीडा स्पर्धा सन 2023-24, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत, जिल्हास्तर शालेय, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर, सोलापूर जिल्हा ज्यूदो असोसिएशन व श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय श्रीपूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीपूर येथे संपन्न झाल्या.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रयत्नांचा आणि त्यांना मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामदासजी देशमुख साहेब व उपाध्यक्षा शुभांगीताई देशमुख व सचिव कारंडे साहेब व संस्थेचे सदस्य यशराजजी देशमुख तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य श्री बनसोडे सर व पर्यवेक्षक अधटराव सर यांनी पुढील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच परिसरातील नागरिकांकडून विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांना शिक्षक व पालक वर्गाकडून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.