महाराष्ट्र

डॉ.यशवंत कुलकर्णी यांना आदर्श कार्यकारी संचालक पुरस्कार प्रदान | Best MD Dr.Yashwant Kulkarni

आदर्श एम.डी. डॉ.यशवंत कुलकर्णी

आदर्श कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी

नवभारत ग्रुप समूहाने केला पुरस्कार देऊन सन्मान

श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांना साखर उद्योगातील मानाचा असणारा राज्यस्तरीय ‘आदर्श कार्यकारी संचालक’  पुरस्कार नवभारत ग्रुप समूह यांच्या वतीने देऊन सन्मानित करण्यात आले. 

या कार्यक्रमास नामदार दिलीप वळसे पाटील, सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य, नामदार अनिल पाटील मंत्री मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य , खासदार सुनील तटकरे सो, आमदार बाळासाहेब थोरात,  निमेश महेश्वरी अध्यक्ष नवभारत ग्रुप समूह यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हॉटेल ताज प्रेसिडेंट मुंबई येथे पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

गेले अनेक वर्षापासून कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या कारकिर्दीमध्ये व चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाने अनेक देश पातळीवरचे, राज्यपातळीवरचे, बेस्ट पुरस्कार मिळालेले आहेत.  अचूक नियोजन,  शिस्तप्रिय,  सदाबहार व्यक्तिमत्व, कार्यमग्न व्यक्तिमत्व, असे अनेक पैलू अंगी असलेले व्यक्तिमत्व म्हणजेच डॉ.यशवंत कुलकर्णी. पुरस्कार मिळाल्याची बातमी  समजतात सर्व स्तरातून त्यांचे सोशल मीडिया वरती अभिनंदन केले जात आहे.

Awarded to Dr. Yashwant Kulkarni as an exemplary executive director

Model Executive Director Dr. Yashwant Kulkarni

Honored by Navbharat Group

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!